ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसेंच्या  विरोधात विरोधकांची मोटबांधणी सुरु

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

मालेगाव : लोकसभा पराभवाचे चिंतन करण्यापेक्षा अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन त्यांना सरसकट कर्ज मिळवून देण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढून जनावरांचा चारा-पाणी व दुष्काळाच्या पाश्‍र्वभूमीवर जनआंदोलन उभारु. तालुकयातील शेतकरी कुटूंबीयांची सभा घेवून शेतकऱ्यांची शक्ती शासनकर्त्यांना दाखवून देवू. जगाचा पोशींदा जर रस्त्यावर उतरला तर त्याचे काय परिणाम होतात याची सरकारला जाणीव करुन दिली जाईल असे प्रतिपादन नाशिक जिल्हा कृषि औद्योगीक सहकारी संघाचे अध्यक्ष व युवानेते अद्वय हिरे यांनी बुधवारी (ता.19) येथे केले. 

भाजपा-शिवसेना विरोधी सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकाऱ्यांची येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, कॉंग्रेसनेते प्रसाद हिरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदिप पवार, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र भोसले, काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, भारीप जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे, रिपाईचे (गवई गट) अध्यक्ष भगवान आढाव, मनसे महानगर जिल्हाध्यक्ष राकेश भामरे, रिपाईचे नेते दिपक निकम, मविप्र संचालक डॉ. जयंत पवार, काँग्रेसचे शांताराम लाठर, प्रहार संघटनेचे शेखर पगार, समता परिषदेचे धर्मा भामरे, सोमनाथ आहिरराव, ॲडव्होकेट आर. के. बच्छाव आदींसह विरोधी पक्षाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news political leader meeting