loksabha2019 राजकिय पक्षांकडून साडेचारशे सभातून प्रचार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 एप्रिल 2019

नाशिकः येत्या सोमवारी जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार असल्याने आज प्रचाराचे ताबूत थंडावले. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यातील विविध मतदार संघात विविध राजकिय पक्षांनी लहान मोठ्या एकंदर 450 जाहीरसभा घेउन मतदार राजाला आवाहन केले. 

   नाशिक,दिंडोरी आणि धुळे मतदार संघातील 3 विधानसभा अशा अडीच लोकसभा मतदार संघातील 4720 मतदार केंद्रावर होणाऱ्या निवडणूकीसाठी सगळ्याच प्रमुख राजकिय पक्षांचे नेते हजेरी लावून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस, ज्येष्ठ नेते शदर पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे ऍड प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे नबाव मलिक, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यापासून इतरही अनेक दिग्गज नेत्यांनी तब्बल 450 सभातून जोरदार आरोप-प्रत्यारोप पहायला,ऐकायला मिळाले

Web Title: marathi news political sabha