विशेष मुलांचा म्युझिकल्स फिटनेस फंडा, प्रबोधीनीच्या उपक्रमांची लिम्कामध्ये नोंद

live
live

नाशिक : केंद्रीय क्रीडा मंत्री हर्षवधन राठोड यांच्या फिटनेस चॅलेंजची देशभर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर क्रिकेटपटू विराट कोहली यांनी फिटनेस टेस्ट दिली. पण श्रद्धा लॉन्स येथे झालेला "म्युझिकल फिटनेस'चा उपक्रम देशात एकमेव अन्‌ आगळा-वेगळा उपक्रम संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारा असाच आहे. वय वर्ष तीन पासून तर पन्नासपर्यंतच्या विशेष मुलांनी या उपक्रमात सहभागी होतांना तब्बल एक तास न थांबता नृत्याविष्कार सादर केला. या उपक्रमाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डसाठी घेण्यात आली आहे. 

प्रबोधिनी ट्रस्ट अंतर्गत येणारी विविध विद्यालये, सिद्धीविनायक स्कूल आणि प्रज्ञा भोसले-तोरस्कर यांच्यातर्फे आयोजित या उपक्रमात या विशेष विद्यार्थ्यांच्या शारीरीक व मानसिक आरोग्यासाठी उपयुक्‍त असे नृत्यप्रकार करवून घेतले. प्रशिक्षिका प्रज्ञा भोसले-तोरस्कर यांनी सहभागींकडून संगीताच्या तालावर आधारीत व्यायाम प्रकार करवून घेतले. कधी संथ संगीत तर कधी उचल घेणारे संगीत असे वैविध्यपूर्ण संगीत प्रकारावर नृत्याविष्कार सादर झाला. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे शिक्षकही सहभागी झाले होते. 

या उपक्रमासाठी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्‍त राजेंद्र कलाल, नीलेश पाटील यांच्यासह श्रद्धा लॉन्सतर्फे सुरेश पाटील, प्रबोधिनी ट्रस्टचे अध्यक्ष सुलभा सरवटे, सचिव डॉ. दिलीप भगत, खजिनदार पुनम यादव, प्रबोधिनी विद्या मंदिरच्या श्रीमती वनिस, सुनंदा केले विद्यालयाच्या साधना वाणी, संगीता पाटील, रोहिणी आस्वल आदी पस्थित होते. तर लिमका बुक ऑफ रेकॉर्डसाठी समीर तोरस्कर यांनी सहकार्य केले. 

परिश्रमाचे फलीत 
विशेष मुलं एका जागी स्थिर बसत नाही, अशा परीस्थितीत त्यांचा कार्यक्रम घेण्यापूर्वी प्रशिक्षण देण्याची आवश्‍यकता होती. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून उपक्रमाच्या नियोजनाला सुरवात झाली होती. एप्रिलपर्यंत सराव केल्यानंतर मे महिन्यात सुट्यांमुळे पुन्हा खंड पडला होता. पण गेल्या पंधरा दिवसांत कसून सराव करतांना प्रशिक्षक प्रज्ञा भोसले-तोरस्कर यांनी सराव करून घेतला. त्याचे फलीत म्हणून आज विशेष मुलांनी तासभर संगीताच्या तालावर ठेका धरला होता. 

उत्स्फूर्तपणे खाऊ वाटप 
कार्यक्रमाची अनुभूती घेण्यासाठी विशेष मुलांचे पालक आले होते. आपल्या पाल्याला नृत्य करतांना पाहून पालक भारावले होते. त्यातच पालकांनी उत्स्फूर्तपणे खाऊ वाटप केले. सहभागींना आपआपल्या पद्धतीने प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नदेखील केला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com