भाजीपाला विक्रेत्याची मुलगी प्रतिभा माळीला सुवर्णपदक

जगन्नाथ पाटील
गुरुवार, 11 जानेवारी 2018

धुळे - येथील संजय मोतीराम माळी अल्पशा शेतीवर भाजीपाला उत्पादित करतात. स्वतः विक्री करुन भाजीपाल्याची मार्केर्टींग करुन उदरनिर्वाह करतात. त्यांना कामात पत्नीसह मुलगी प्रतिभा माळी मदत करते. प्रतिभाने बारावीत पहिला क्रमांक मिळविला. तेव्हापासून अभ्यासासाठी अधिक वेळ देत आता तर प्रतिभाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समाजशास्त्र विषयात पहिला क्रमांक मिळविला आहे व ती सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. महाविद्यालयातून भ्रमणध्वनीवरुन वडिलांना माहिती मिळाली. अन माळी कुटूंबात आनंद व्यक्त झाला.

प्रतिभा संजय माळी सोनगीर (ता. धुळे) येथील बहूजन विद्या प्रसारक संस्थेच्या वरीष्ठ महाविद्यालयात 2016-17 बी. ए. च्या शेवटच्या वर्षात होती. विद्यापीठाने नुकतीच गुणवत्ता यादी जाहिर केली. यात प्रतिभा समाजशास्त्र विषयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. अन् सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे. प्रतिभाच्या या यशाने वडिल संजय माळी, विजय माळी आदींनी समाधान व्यक्त केले आहे. प्रतिभा माळीने सांगितले की, कष्ट करतांनाच शिक्षणाचे महत्व कळले. शेती व्यवसाय बिकट आहे. महिलांना स्वावलंबी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अभ्यास, मनन आणि कला शाखेत नियमित लिखाण हा यशाचा मार्ग आहे. सध्या एम. ए. च्या पहिल्या वर्षाला आहे.
 दरम्यान सोनगीर महाविद्यालयाचे अध्यक्ष अमृतराव कासार प्राचार्य के. बी. पाटील, समाजशास्त्र विभाग प्रमुख ए. बी. पाटील, अरविंद पाटील, आर. जी. खैरनार, नरेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

Web Title: marathi news pratibha mali clever girl farmer's daughter win gold medal