'प्रधानमंत्री बेटी बचाओ' योजनेद्वारे बनवेगिरी

जगन्नाथ पाटील
बुधवार, 10 जानेवारी 2018

धुळे - प्रधानमंत्री बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत सहा ते बत्तीस वयोगटातील मुलींना केंद्रसरकार दोन लाख देणार आहे. लवकर फाॅर्म भरुन दिल्लीला रवाना करा. अन्यथा उशिर झाल्यास फायदा मिळणार नाही. अशी वार्ता खेडोपाडी पसरली आहे. झेराॅक्स दुकानांवरील हिंदीतील छापील अर्ज पाच पासून पन्नास रुपयांपर्यंत विकला जात आहे. अशी कोणतीही योजना नाही. तरी फसव्या योजनेच्या नावाखाली एजंटगिरी सुरु झाली आहे. खर्‍या योजनांबरोबर फसव्या योजनेतही एजंटगिरी सुरु होवूनही शासन अन् प्रशासनही उपाययोजनेच्या बाबतीत कुचकामी ठरत आहे.

अर्जामध्ये गोपनीय माहितीही आवश्यक...
फसवेगीरी करणार्‍या या अर्जात  नाव, जन्म दिनांक, आधार क्रमांक, ईमेल आयडी, बँक खाते क्रमांक, आई.एफ.एफ.सी.कोड, बोनाफाईड, टीसी, सरपंच किंवा नगरसेवकाचा शिक्का सही आदी बारीकसारिक माहिती नमूद करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. तसेच इतर माहितीत पंतप्रधानांनी तीस करोड रुपये गुंतवीले आहेत. देशभर सुरुवात झाली आहे.प्रत्येक सहा ते बत्तीस वयोगटातील
मुलींना दोन लाख मिळणार आहेत आदी नमूद आहे. भारत सरकार महिला एवं बाल विकास मंत्रालय शांती भवन नवी दिल्ली या पत्यावर अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे.

झेराॅक्स व्यवसायाची चलती
जिल्हाभरात या फसव्या योजनेच्या अर्जांची विक्री वाढली आहे. पाच पासून पन्नास रुपयांपर्यंत विकले जात आहेत. त्याचबरोबर लिफाफा आणि पाच रुपयाच्या तिकिटांची विक्रीही वाढली आहे. हे सर्व झेराॅक्स दुकानांवर उपलब्ध आहे. परीणामी व्यवसायाची चलती वाढली आहे.

सरकार डिजिटल अर्ज मुद्रीत?
देशभरात डिजिटल इंडियाचा बोलबाला आहे. सर्व आॅनलाईन झाले आहेत. हा अर्जच मुद्रीत स्वरुपात काय याचीही कारणमिमांसा होत नसल्याने जाणकारांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

त्या एजंटांवर व्हावी कारवाई
सध्या जिल्ह्यात फसव्या योजनेच्या नावाखाली एजंटगिरी सुरु झाली आहे. खर्‍या योजनांबरोबर फसव्या योजनेतही एजंटगिरी सुरु होवूनही शासन अन प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावर प्रभावी  उपाय योजनेची गरज आहे. पण  कुचकामी धोरणांमुळे फसवणूक वाढत चालल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Web Title: marathi news prime minister save girl child scheme fraud