पालिकेच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची विभागिय चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील निलंबित करण्यात आलेल्या आठ मुख्याध्यापक व शिक्षकांच्या विभागिय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी महापालिकेऐवजी इतर विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चार जूनला विभागिय चौकशी होणार आहे. 

महापालिकेच्या आडगाव येथील शाळेतील शिक्षक मुरलीधर भोर यांच्यावर शाळेतील विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. मुख्याध्यापिका जयश्री पंगुळवाडे यांना बोगस पदवी सादर केली म्हणून यापुर्वी निलंबित करण्यात आले आहे. लाच घेतल्याने शैला मानकर यांना निलंबित करण्यात आले तर शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी शैला मानकर या मुख्याध्यापिकेने लाच मागितल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणी हिरामण बागुल यांना अटक करण्यात आली होती. तर लता गरुड या शिक्षिका रजेवर असताना देखील त्यांची हजेरी पटावर स्वाक्षरी आढळून आली होती. ज्ञानदेव पगार यांच्यावर देखील निलंबनची कारवाई करण्यात आली होती. मुख्याध्यापकांसह निलंबित शिक्षकांची विभागिय चौकशी करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. दोषारोप निश्‍चितीनंतर पुढील कारवाई होईल. 

36 शाळांचे विलिनिकरण 
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक परिसर एक शाळा उपक्रमांतर्गत 36 शाळांचे जवळच्या शाळेत विलिनिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पंधरा जून पासून निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार आहे. शाळा विलिनिकरणामुळे 58 शिक्षक, अकरा मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले असून त्यांचे समायोजन केले जाणार आहे. 

Web Title: marathi news principle,head master and teacher