शेतकऱ्यांना सुखी, सुरक्षित करण्यासाठी कटिबद्ध - पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

अमळनेर - राज्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी आगामी काळात कंपन्यांमध्ये चढाओढ राहील. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही. हा प्रश्‍नच आपण संपवून टाकणार आहोत. विविध योजनांतून सुखी करण्यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्‍वासन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. येथील बाजार समितीच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन, भुमिपूजन व आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. 

अमळनेर - राज्यातील शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी आगामी काळात कंपन्यांमध्ये चढाओढ राहील. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळाला नाही. हा प्रश्‍नच आपण संपवून टाकणार आहोत. विविध योजनांतून सुखी करण्यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्‍वासन महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. येथील बाजार समितीच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन, भुमिपूजन व आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. 

सहकार पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीयमंत्री एम. के. पाटील, विजय नवल पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, उन्मेष पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी व्यासपीठावर होते. श्री. पाटील पुढे म्हणाले, "शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या अपघातात मृत्यू होतात. त्यास आजपर्यंत काहीही मिळत नव्हते. यासाठी (स्व.) गोपीनाथ मुंडे विमा योजना आणली. यात प्रिमियम व अर्जही भरण्याची शेतकऱ्याला गरज नाही. हा प्रिमियम महसूलकडून भरला जात आहे. दरवर्षी 34 कोटी रुपये प्रिमिअर जमा होतो. एखाद्या गावात शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास या योजनेतून दोन लाख रुपये त्याच्या कुटूंबियांना लाभ दिला जात आहे. अटल पेन्शन योजनेतून ज्येष्ठांना सुरक्षित करण्यात आले आहे. या योजनेत वर्षाला 205 रुपये भरावयाचे आहेत. 60 वर्षापर्यंत हे पैसे भरावयाचे असून, त्यानंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन सुरु होईल. राज्यातील रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुरवातीला 1800 कोटी रुपयांचे बजेट आले होते. मात्र, येत्या दोन वर्षात 30 हजार कोटी रुपयांचे रस्ते तयार होणार आहेत. यात दहा किलोमीटर रस्ते थ्रीलेन करणार आहोत. दोन टप्प्यात पंधरा-पंधरा हजार कोटी रुपये खर्चून रस्ते बनविले जाणार आहेत. याच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. वर्कऑर्डरही लवकरच काढल्या जात आहेत. दीड वर्षात ही कामे करण्याचा कंत्राटदारांना आग्रह आहे. पाच हजार किलोमीटर रस्ते केंद्राकडे होते. आपण प्रयत्न करून 22 हजार किलोमीटर रस्ते केंद्राकडून मंजूर केले आहेत. यासाठी केंद्र सरकार एक लाख सहा हजार कोटी रुपये देणार आहे. यावर्षी वीस हजार कोटी रुपये देण्यातही आले आहेत. येत्या तीन वर्षात 38 हजार किलोमीटर रस्ते होतील. दहा वर्षात गोटी एवढा खड्डाही पडणार नाही, असे नियोजन सुरु आहे. भारतमाला योजनेत सहा पदरी रस्ते तयार करण्यात येणार आहेत. सहा हजार किलोमीटरचा यात समावेश आहे. हे सरकार सामान्य माणसाच सुखाच, सुरक्षिततेचे विचार करणारे सरकार आहे. या सरकारला आपण साथ द्यावी. सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री देशमुख म्हणाले, की अनेक जण ओरडले की ऑनलाईनमुळे अडचणी आहेत. मात्र, राज्यात 77 लाख शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. अर्जांची छाननी करून आतापर्यंत 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा हजार कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्‍वासित केल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. जे चुकीचे कामे करतील त्यांना ऑनलाईनच्या अडचणी आहेत. चुका होत असतील तर त्या दुरुस्ती केल्या जातील. ज्यांचे सर्व बंद पडले आहे, असे हल्लाबोल करीत आहेत. मात्र, यातून काहीही साध्य होणार नाही. जळगावच्या 1 लाख 86 हजार खातेदारांपैकी 1 लाख 72 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 570 कोटी रुपये जमा झाले आहेत. जळगावकरांचे काम कौतुकास्पद आहे. जे शेतकरी राहिले असतील त्यांचा पुढच्या काळात निपटारा करण्यात येईल. कर्जमाफी बरोबर शेतकऱ्यांना हमीभावाचीही गरज आहे. यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत. शेतकरी तारण योजनेसह विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा." 

जलसंपदामंत्री महाजन म्हणाले की, "पाडळसे धरणाच्या कामासाठी येत्या अर्थसंकल्पात अडीचशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात येईल. तालुक्‍यातील सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या विविध योजनांसाठी 620 कोटी रुपये आपण मंजूर करीत आहोत. सिंचनाचे सुक्ष्म व उत्कृष्ट नियोजनन केल्याने देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आला आहे. आगामी काळात सिंचनासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल." यावेळी आमदार चौधरी, आमदार श्रीमती वाघ यांनीही मनोगत व्यक्‍त केले. तालुक्‍यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.

Web Title: marathi news promise to farmers by chadrakant patil