मिळकती पाचशे कोटींच्या वार्षिक भाडे मात्र अवघे पंधरा लाख 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

नाशिक : शहरात महापालिकेच्या मालकीच्या करोडो रुपयांच्या मालमत्ता अवघ्या एक ते एक हजार रुपयांना वार्षिक भाडे तत्वावर देण्यात आल्या आहेत. बाजारात या मालमत्तांची किंमत पाचशे कोटी रुपयांच्या वर असल्या तरी त्यातून पालिकेला जेमतेम पंधरा लाख रुपयांचे वार्षिक भाडे प्राप्त होत असून त्यातून पालिकेला करोडो रुपयांचा तोटा येत आहे. विशेष म्हणजे या मालमत्ता अल्प भाडे तत्वावर देण्यात आल्या असताना त्या मालमत्तांचा देखभाल व दुरुस्तीची खर्च महापालिकेला करावा लागत असून त्यावर करोडो रुपये खर्च होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

एकीकडे पालिकेच्या महसुलात वाढ करण्यासाठी मालमत्ता करात वाढ करण्यासाठी प्रशासनाने जंगजंग पछाडले असताना दुसरीकडे करोडो रुपयांच्या मालमत्ता कवडीमोल दरात भाडे तत्वावर देण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडे गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून मालमत्ता अगदी कमी दरात देण्यात आल्या आहेत त्यांच्याकडून मात्र वर्षाला लाखो रुपयांची कमाई होत असल्याचे प्रकार देखील होत आहे. एकुण 903 मालमत्तांपैकी बारा मालमत्तांवर अवघे एक ते बारा रुपये वार्षिक भाडे आहे तर 138 मालमत्ता अशा आहेत कि त्यावर 101 रुपये वार्षिक भाडे आकारण्यात आले आहे.

149 समाजमंदीरे, 81 सभामंडप, 151 व्यायामशाळा, 42 अभ्यासिका व सतरा वाचनालयांसाठी पालिकेने दिलेल्या ईमारतींवर भाडे आकारणीचं होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. युवकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून तयार करण्यात आलेल्या बहुतांश व्यायामशाळा ह्या अंगणवाडीसाठी उपयोगात आणल्या जात आहे. शहरात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, सिडकोतील गणेश चौकातील क्रिडांगणे अगदी कमी किमतीत भाडे तत्वावर देण्यात आले आहेत. शंभर ते दोनशे चौरस मीटरच्या शहराच्या मध्यवर्ती भागातील जागा अवघे एक ते 101 रुपयांना भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. 
 
करोडो रुपयांची मालमत्ता 
खुले मैदाने, क्रिडांगणे, अभ्यासिका, व्यायामशाळा, सभागृहे, समाजमंदिरांची संख्या व ज्या भागात या मिळकती तयार करण्यात आल्या आहेत त्याची बाजारातील किंमत पाचशे कोटी रुपयांच्या वर आहेत. परंतू महापालिकेकडून सर्व मालमत्तांवर मिळून 14 लाख 95 हजार 765 रुपये वार्षिक भाडे वसुल केले जाते. ज्यांच्याकडे अल्पदरात मिळकती वर्ग करण्यात आल्या आहेत त्या आजी-माजी नगरसेवकांशी संबंधित कार्यकर्ते असल्याने नगरसेवकांनाचं हाताशी धरून पालिकेचे करोडो रुपयांचे नुकसान करण्याचे उद्योग सुरु आहेत. 

महापालिकेच्या विभागनिहाय मालमत्ता 
विभाग समाजमंदीरे सभा मंडप सभागृह व्यायामशाळा अभ्यासिका वाचनालय खुल्या जागा 
पंचवटी 96 19 1 44 05 14 40 
पुर्व 60 13 35 26 11 4 10 
पश्‍चिम 43 01 01 23 13 01 06 
सिडको 31 38 01 50 08 05 13 
सातपूर 46 07 00 23 09 01 06 
नाशिकरोड 31 06 00 26 12 03 06 

Web Title: marathi news property in nashik