आणखी महिनाभर पुणे एक्‍सप्रेस  कल्याण ऐवजी दौंड मार्गेच धावणार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नाशिक ः कर्जत भागातील मंकी हिल येथील तांत्रीक बिघाडामुळे कल्याण ऐवजी दौंड मार्गे पुण्याला जाणारी भुसावळ पुणे एक्‍सप्रेस आणखी पुढील पूर्ण महिणाभर 

नाशिक ः कर्जत भागातील मंकी हिल येथील तांत्रीक बिघाडामुळे कल्याण ऐवजी दौंड मार्गे पुण्याला जाणारी भुसावळ पुणे एक्‍सप्रेस आणखी पुढील पूर्ण महिणाभर 
मनमाड दौंड मार्गेच पुण्याला जाणार आहे. त्यामुळे मनमाड ते कल्याण दरम्यानच्या प्रवाशांची सुरु असलेली गैरसोय आणखी महिणाभर कायम राहाणार आहे. भुसावळ पुणे हुतात्मा एक्‍सप्रेस (11025) या गाडीच्या मार्गात गेल्या 1 ऑक्‍टोबरपासून मार्गात बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील मंकी हिल ते कर्जत रेल्वे स्थानका दरम्यान तांत्रिक कामकाज सुरु असल्याने, हुतात्मा एक्‍सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. गेल्या महिणाभरापासून हुतात्मा एक्‍सप्रेस ही मनमाड नाशिक रोड कल्याण मार्गाऐवजी मनमाडहून दौंड मार्गे पुण्याला जाते. ÷उद्यापासून ती पूर्ववत धावणार होती. मात्र उद्यापासून पुढील आणखी महिणाभर तरी, गाड़ी (11025) अप भुसावळ पुणे हुतात्मा एक्‍सप्रेस मनमाड , दौंड मार्गानेच पुण्याला रवाना होणार आहे. परतीच्या मार्गातही गाड़ी (11026) डाउन पुणे भुसावल दरम्यान धावतांना हुतात्मा एक्‍सप्रेस 30 नोव्हेंबरपर्यत दौंड , मनमाड मार्गेच भुसावळला रवाना होईल. त्यामुळे पुढील महिणाभर या मार्गावरील मनमाड ते कल्याण दरम्यान रेल्वेने पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय कायमच राहणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pune express