विद्यापीठांतर्गत अभ्यासक्रमांची  15 ते 18 जूनदरम्यान प्रवेश परीक्षा

residentional photo
residentional photo

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतर्फे चालविल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदवी, पदवी शिक्षणक्रमांसाठी ऑनलाईन एंट्रान्स एक्‍झामद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जारी झाले असून 15 ते 18 जून दरम्यान या परीक्षा विविध चार सत्रांमध्ये पार पडणार आहेत. 
ऑनलाईन एक्‍ट्रान्स एक्‍झाम ही शंभर गुणांसाठी असेल. यात बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्‍न विचारले जातील. यापैकी वीस गुण हे सामान्य ज्ञान, आकनल क्षमता, तर्कशास्त्र आदीसंदर्भातील असतील. तर उर्वरित 80 गुण हे विषयाशी निगडीत असतील. तसेच चुकीच्या प्रश्‍नासाठी गुणांची कपातही केली जाणार आहे. विविध संवेधानिक आरक्षणासह दिव्यांग, माजी सैनिकी यांसह तीस टक्‍के महिलांसाठी आरक्षण असेल. तसेच विशेष आर्थिक मागास प्रवर्गालाही आरक्षण दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com