नाशिककर जपताहेत पेशवेकालीन रहाडीची परंपरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

जुने नाशिकः रंगपंचमीच्या दिवशी रहाडीत रंग खेळण्याची शहराची पेशवी काळीन परंपरा आहे. आजही शहरातील काही भागात रहाड संस्कृतीचे जतन केले जाते. त्यात जुनी तांबड लेन येथील रहाडीचा समावेश आहे. या पारंपारिक पेशवेकालीन रहाडीचे शनिवार (ता.3) रोजी खोदकाम करण्यात आले. 

जुने नाशिकः रंगपंचमीच्या दिवशी रहाडीत रंग खेळण्याची शहराची पेशवी काळीन परंपरा आहे. आजही शहरातील काही भागात रहाड संस्कृतीचे जतन केले जाते. त्यात जुनी तांबड लेन येथील रहाडीचा समावेश आहे. या पारंपारिक पेशवेकालीन रहाडीचे शनिवार (ता.3) रोजी खोदकाम करण्यात आले. 

होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात धुळवट साजरी करुन रंग खेळला जात असतो. फक्त राज्याच्या काही भागात होळीच्या सहाव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जात असते. त्यात शहराचा समावेश आहे. अतिशय उत्सहात रंगपंचमी साजरी करताना रहाडीत रंग खेळण्याचा विशेष महत्व दिले जाते. पेशवे काळीन पंरपरेनुसार रहाडीत रंग खेळला जात असतो. त्यानिमित्ताने शहराच्या विविध भागात पेशवे काळात रहाडी तयार करण्यात आल्या आहे. त्यात जुनी तांबट लेन येथील "आपल्या रहाडीचा' समावेश आहे. येत्या मंगळवारी (ता.6) रोजी रंगपंचमी साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने जुनी तांबट लेनमधील रहाडीचे शनिवार (ता.3) रोजी जेसीबीच्या सहाय्याने दिवसभर खोदकाम करण्यात आले. त्यातील माती काढून रहाडीचे स्वरुप करुन देण्यात आले. खोदकाम सुरु असल्याचे पहाण्यासाठी नागरीकानी गर्दी केली होती. दोन दिवसात रहाडीची स्वच्छता करण्यात येणार आहे. 
पेशवे काळापासून येथील रहाडीत रंग खेळण्याचा आनंद घेतला जात होता. 40 वर्षापूर्वी काही कारणांमुळे ही रहाड बंद करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी तब्बल 40 वर्षानंतर येथील युवकांच्या मदतीने रहाड पुन्हा सुरु करण्यात आली. मोठ्या उत्सहात रंगपचमी खेळली गेली. रहाडीचे यंदा दुसरे वर्ष आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी रंग खेळण्यासाठी जास्त गर्दी होण्याची शक्‍यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. त्यानूसार दुपारी महिलासाठी 1 तासाची विशेष वेळ देण्यात येणार असल्याचे आयोजकानी सांगतले आहे. 

रहाडीचे ठिकाण 
- जुनी तांबटलेन (जुने नाशिक) 
- तिवंधा चौक (जुने नाशिक) 
- शनिचौक (पंचवटी) 
- दहिपुल (गाडगे महाराज पुल परिसर) 

 

Web Title: MARATHI NEWS RAHAD PARAMPARA

टॅग्स
फोटो गॅलरी