Vidhan Sabha 2019 पुर्वेत भाजपमध्ये नाट्यमय घडामोडी ,मनसेच्या ढिकलेच्या प्रवेशाने सानप यांच्यावर फुली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

नाशिक- राजकारणाच्या दृष्टिने शहरात सर्वाधिक संवेदनशील बनलेल्या पुर्व विधानसभा मतदारसंघाबाबत आज दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे नाव वगळल्यानंतर स्थायी समितीचे सभापती उध्दव निमसे यांचे नाव आघाडीवर असतानाचं भाजपने दोघांच्या भांडणाचे निमित्त करून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. राहुल ढिकले यांना गळाला लावले. पक्षाच्या सर्वेक्षणात ढिकले यांचे नाव आघाडीवर असल्याने त्यांचा पर्याय निवडण्यात आल्याचे समर्थन करण्यात आले तर आमदार सानप यांना राजकीय पुर्नवसनाचे आश्‍वासन देण्यात आले.

नाशिक- राजकारणाच्या दृष्टिने शहरात सर्वाधिक संवेदनशील बनलेल्या पुर्व विधानसभा मतदारसंघाबाबत आज दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे नाव वगळल्यानंतर स्थायी समितीचे सभापती उध्दव निमसे यांचे नाव आघाडीवर असतानाचं भाजपने दोघांच्या भांडणाचे निमित्त करून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. राहुल ढिकले यांना गळाला लावले. पक्षाच्या सर्वेक्षणात ढिकले यांचे नाव आघाडीवर असल्याने त्यांचा पर्याय निवडण्यात आल्याचे समर्थन करण्यात आले तर आमदार सानप यांना राजकीय पुर्नवसनाचे आश्‍वासन देण्यात आले. त्यानंतर शहरात सानप समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करतं बंडाचे निशाण फडकविण्याचा निर्णय घेतला तर निमसे समर्थक देखील त्याच मार्गाने असल्याने पुर्वेत देखील भाजपला निवडणुक सोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

विधानसभा निवडणुक जवळ येत असताना पुर्व मध्ये भाजपचा आगामी उमेदवार कोण यावरून चर्वितचर्वण सुरु होते. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नवीन चेहरा देण्याचे सुतोवाच केल्यानंतर पंचवटी, नाशिकरोड भागातील अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या पहिल्या यादीतून श्री. सानप यांना वगळल्यानंतर पंचवटीत राजकीय भुकंप झाला. सानप यांच्या ऐवजी उध्दव निमसे यांचे नाव पुढे आले. दोघांकडून पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मुंबईतील बंगल्यात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. नगरसेवकांनी त्यांच्या परिने समर्थन केले. त्यामुळे निमसे व सानप यांच्यातचं उमेदवारीसाठी स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतू आज मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. राहुल ढिकले राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतानाचं दुपारी बारा वाजेच्या सुमारास पालकमंत्री महाजन यांच्या बंगल्यात पुर्वच्या उमेदवारीवरून खलबते सुरु होती. 

राहुल यांचा मनसे प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा 
  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. राहुल ढिकले यांनी पदासह सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आज सादर केला. मुंबईत भाजप मध्ये ढिकले यांचा प्रवेश निश्‍चित झाल्यानंतर आज त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देताना पक्षप्रवेशाचे कारण दिले नसले तरी पुर्व मधून माजी महापौर अशोक मुर्तडक यांना उमेदवारी जाहीर झाल्याने नाराजीचा सुर म्हणून राजीनामा दिल्याचे समर्थन त्यांच्याकडून करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rahul dhikle