बेरोजगारीच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचा रेल रोको

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

नाशिक– केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकरोड रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना अडविण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जॉब दो जवाब दो, फसवणीस सरकार जॉब दो अशा घोषणा देत कार्यकर्ते रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना रेल्वे सुरक्षा पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविले.

नाशिक– केंद्र व राज्य सरकारच्या अपयशामुळे बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकार विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष अंबादास खैरे, पुरुषोत्तम कडलग यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकरोड रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांना अडविण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. जॉब दो जवाब दो, फसवणीस सरकार जॉब दो अशा घोषणा देत कार्यकर्ते रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना रेल्वे सुरक्षा पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडविले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनमाड-भुसावळ रेल्वे थांबवून सरकारचा निषेध केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rail problem