पहिले या अन् पहिली जागा मिळवा,रेल्वेच्या जनरल डब्यात  बायोमेट्रीक

अमोल खरे
बुधवार, 31 जुलै 2019

मनमाड  - रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर असून रेल्वेच्या जनरल डब्यात लवकरच बायोमेट्रिक तंत्रज्ञान सुविधा येणार आहे फिंगर प्रिंट च्या आधारे रेल्वे तिकीट बुक करता येणार असल्याने पहिले या आणि पहिली जागा मिळवा' या तत्वावर आता जनरल डब्यात   जागा मिळणार आहे पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता इतर रेल्वे गाड्यांमध्ये देखील ही सुविधा सुरू करणार आहे यामुळे फुकटे प्रवाशी आणि गर्दी यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे 

मनमाड  - रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर असून रेल्वेच्या जनरल डब्यात लवकरच बायोमेट्रिक तंत्रज्ञान सुविधा येणार आहे फिंगर प्रिंट च्या आधारे रेल्वे तिकीट बुक करता येणार असल्याने पहिले या आणि पहिली जागा मिळवा' या तत्वावर आता जनरल डब्यात   जागा मिळणार आहे पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता इतर रेल्वे गाड्यांमध्ये देखील ही सुविधा सुरू करणार आहे यामुळे फुकटे प्रवाशी आणि गर्दी यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे 
                     रेल्वेच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात प्रवाशी जनरल डब्यातून प्रवास करतात मात्र लांबचा प्रवास करायचा असेल तर प्रवाशांकडून रेल्वेचे तिकीट बुक करण्यात येते पण सामान्य डब्यातून तिकीट काढूनही प्रवास करताना गर्दीमुळे जागा मिळत नाही बसायला अथवा पाय ठेवायला जागा मिळेलच याची शाश्वती नसते डब्ब्यात चढण्यासाठी प्रवाशांमध्ये चढाओढ असते,  जागेसाठी प्रवाशांमध्ये भांडणे होतात गाडी यायच्या अगोदरच अनेक तास प्रवासी रेल्वे स्थानकांवर गर्दी करतात जनरल डब्यातून अनेक प्रवासी हे विना तिकीट देखील प्रवास करतात तर दलाल लोक जागा पकडून प्रवाशांकडून पैसे कमावतात मोठ्या स्थानकांवर परिस्थिती तर अधिक भीषण असते मात्र हे सर्व प्रकार रोखण्यासाठी आता  रेल्वेने पहिल्यांदाच बायोमेट्रिक सिस्टिमचा वापर सुरु केला आहे जो पहिला येईल त्याला पहिली जागा मिळणार आहे 
अनारक्षित जनरल डब्यामधून प्रवास करण्यासाठी लवकरच बायोमॅट्रीक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे बोटाचे ठसे जुळवा आणि प्रवास करा डब्याची क्षमता जितकी असेल तितकेच फिंगर प्रिंट मशीन घेणार आहे  
                     छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे मुंबईतील चार रेल्वे स्थानकावर बायोमॅट्रीक मशीन लावण्यात आली आहे यानंतर आता आणखी काही ट्रेनच्या जनरल डब्यामध्ये बायोमॅट्रीक सुविधा लागू केली जाणार आहे
                     
               रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सामान्य प्रवाशांना होणार त्रास लक्षात घेऊन आरपीएफच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हि सुविधा सुरु केली आहे यासाठी खास रेल्वे सुरक्षा बळाचा वापर केला जाणार आहे काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेतील प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने महत्वाची पाऊले उचलणार असल्याचे सांगितले होते हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यासंदर्भात स्वतः रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट वरून माहिती दिली आहे
                     जनरल डब्यांचे तिकिट खरेदी करण्यासाठी प्रवाशांना बायोमेट्रिक मशीनवर आपले बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट) द्यावे लागेल त्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जातो हा क्रमांक जनरल डब्याच्या सीट नंबरच्या क्रमांकानुसार दिलेला असतो यानंतर प्रवाशांना आपल्या मिळालेल्या क्रमानुसार एका रांगेत उभे रहावे लागते एक आरपीएफ जवान प्रवेशद्वारावर उभा असेल जो प्रवाशाला मिळालेला सीट क्रमांक तपासून  प्रवाशाला क्रमानुसार डब्यामध्ये पाठवेल 

- रेल्वेच्या जनरल बोगीत जागेसाठी बायोमेट्रिक मशीन लावणे ही सर्वसामान्य  प्रवासी वर्गाला दिलासा देणारी बाब आहे यामुळे अनधिकृत एजंटची दादागिरी बंद होईल अनेक गुन्हेगार, विना टिकीट प्रवासी यांची ओळख होण्यास मदत मिळेल परंतु बायोमेट्रिक मशीन बरोबर रेल्वेने जनरल बोगीच्या संख्या देखील वाढविणे अपेक्षित आहे
 - नितिन पांडे, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष, मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय समिति सदस्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news railway service