मध्य रेल्वेच्या दूरपल्ल्याच्या रेल्वेच्या  मार्गात 23 तारखेपर्यत बदल 

residentional photo
residentional photo

नाशिकः मध्य रेल्वेच्या दूर पल्ल्याच्या काही गाड्यांच्या मार्गात येत्या 23 ऑगस्टपर्यत बदल करण्यात आला आहे. मध्यरेल्वेच्या जबलपुर स्थानकातील यार्डात नॉन इंटरलॉकिंग रिमोडलिंग कामामुळे हा बदल करावा लागत असल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे. मध्य रेल्वेच्या या मार्गावरुन धावणाऱ्या गरीबरथ एक्‍सप्रेस मुंबईपासून रद्द करण्यात आली आहे. येत्या गुरुवार (ता.22) पर्यत ही रेल्वेगाडी मध्य रेल्वेच्या मार्गावरुन धावणार नाही तर (16229) डाउन म्हैसून वाराणसी एक्‍सप्रेस, (15563) अप जयनगर उधना एक्‍सप्रेस (12362) डाउन मुंबई आसनसोल एक्‍सप्रेस यांचे मार्ग बदलण्यात 
आले आहे. या रेल्वेगाड्या येत्या 22 ऑगस्टपर्यत इटारसी , भोपाळ ,बिना , कटनी मार्गाने पुढे वाराणसीला जातील.(11062) अप दरभंगा लोकमान्य तिलक टर्मिनल्स पवन एक्‍सप्रेस 23 ऑगस्टला या मार्गाने मुंबईला येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com