आषाढ़ी एकादशी निमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

नाशिक- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकासाठी मध्य रेल्वेच्या विविध मार्गावरुन विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहे. जिल्ह्यातील नांदगाव,मनमाडसह मार्गावरील विविध स्थानकावर गाडीला थांबा असेल. 

   मध्य रेल्वेच्या भुसावळ, अमरावती ,खामगांव स्थानकावरुन येत्या 6 जुलैपासून या विशेष रेल्वे गाड्याच्या फेऱ्या सुरु होतील. नवी अमरावती पंढरपुरसाठी (गाड़ी क्रमांक 01155) ही विशेष गाड़ी 06 आणि 9 जुलैला दुपारी दोनला अमरावती स्थानकावरून पंढरपुरसाठी सुटेल. हिच गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा अकराला पंढरपूरला पोहोचेल. त्यानंतर (01156) ही विशेष गाड़ी 7 आणि 13 जुलैला पंढरपुर स्थानकावरून दुपारी चारला नवी अमरावतीसाठी परतीच्या प्रवासाला सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी पावने अकराला गाड़ी अमरावती स्थानकात पोहोचेल. अमरावती पंढरपूर दरम्यान ही रेल्वे बडनेरा, मुर्तिजापुर, अकोला, शेगांव, जलंब, नांदुरा, मलकापुर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा ,चाळीसगाव, नांदगांव, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, नगर,दौंड ,भिगवन, जेउर, कुर्दुवाडी या स्थानकावर थांबेल . 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news RAILWAY TRAIN