दिवाळीच्या गर्दीसाठी रेल्वेतर्फे जादा रेल्वेगाड्या, मध्य रेल्वेकडून ऑक्‍टोबरमध्ये जादा फेऱ्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

नाशिक : दिवाळीला गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची होणारी गर्दी विचारात घेत मध्य रेल्वेने अतिरिक्त जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत. लांब पल्ल्याच्या दिवाळी विशेष रेल्वेगाड्यांमुळे रेल्वेवरील प्रवासी वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. 

ंमुंबई-लखनऊ एक्‍स्प्रेस 
(02107) डाउन मुंबई- लखनऊदरम्यान दर मंगळवारी दुपारी दोनला रेल्वेगाडी सुरू झाली. मुंबई-लखनऊदरम्यान ही जादा गाडी सहा फेऱ्या करणार आहे. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, कानपूर या रेल्वेस्थानकांवर थांबेल. परतीसाठी (01020) अप लखनऊ- मुंबई ही गाडी 2 ऑक्‍टोबरपासून दर बुधवारी दुपारी तीनला लखनऊहून मुंबईसाठी सुटेल. 
(01025) डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस- मंडूआदरम्यान 23 ऑक्‍टोबरपासून दर बुधवारी मध्यरात्री साडेबाराला ही गाडी सोडली जाईल. महिन्यात तिच्या तीन फेऱ्या होतील. परतीसाठी गाडी (02046) अप मंडूआ ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान दर गुरुवारी 24 ऑक्‍टोबरपासून सकाळी सहाला गाडी सुटेल. ही गाडी कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, अलाहाबाद, ज्ञानपूर या स्थानकांवर थांबेल. 
(01133) डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस ते बरौनीदरम्यान 24 ऑक्‍टोबरपासून दर गुरुवारी पहाटे पाचला गाडी सोडली जाणार आहे. परतीसाठी बरोनी येथून मुंबईसाठी (01134) ही गाडी 25 ऑक्‍टोबरपासून दर शुक्रवारी सायंकाळी साडेसातला बरौनी- लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान गाडी सोडली जाणार आहे. महिन्यात साधारण या गाडीच्या तीन फेऱ्या होतील. 

राजकोटसाठी विशेष गाडी 
राजकोटसाठी जळगावहून 21 ऑक्‍टोबरपासून दर सोमवारी रात्री पावणेआठला (01207) अप नागपूर- राजकोट गाडी सोडली जाईल. 
वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदुरबार, सुरत, भरूच, बडोदा, आणंद, अहमदाबाद, सुरेंद्रनगर या स्थानकांवर ही गाडी थांबेल. परतीसाठी हीच गाडी (01208) डाउन राजकोट- नागपूरदरम्यान दर मंगळवारी 22 ऑक्‍टोबरला रात्री दहाला सुटेल. 

लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटियादरम्यान दर बुधवारी सकाळी पावणेआठला गाडी (08610) डाउन अतिजलद लोकमान्य टिळक टर्मिनस- हटियादरम्यान गाडी सोडली जाईल. परतीसाठी (08609) अप हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी दर बुधवारी सायंकाळी साडेपाचला गाडी (08609) अप सुपरफास्ट हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी सोडली जाईल. ही गाडी कल्याण, इगतपुरी, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगडा, राउलकेला या स्थानकांवर थांबेल. 

पुण्याहून नाशिकमार्गे गाड्या 
(01419) डाउन पुणे- नागपूरसाठी दर शुक्रवारी 18 ऑक्‍टोबरपासून रात्री साडेसाडेनऊला (01419) डाउन सुपरफास्ट विशेष गाडी पुणे- नागपूरसाठी सोडली जाणार आहे. लोणावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा या स्थानकांवर गाडी थांबेल. गोरखपूरसाठी मुंबईसोबत पुण्याहून विशेष गाडी सोडली जाणार आहे. त्यात (01453) डाउन पुणे- गोरखपूर ही गाडी 21 ऑक्‍टोबरपासून दर सोमवारी रात्री साडेअकराला गाडी सुटेल. नगर, बेलापूर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, झाशी, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, बस्ती या स्थानकांवर ही गाडी थांबेल. परतीसाठी गाडी (01454) अप गोरखपूर- पुणेदरम्यान दर बुधवारी रात्री पावणेअकराला गोरखपूरहून सुटेल. परतीसाठी गाडी (01419) नागपूरहून दर रविवारी दुपारी चारला पुण्यासाठी सोडली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news railyway train