नाशिक जिल्ह्यात ग्रामीण भागात पावसाचा जोर,रस्त्यावर झाडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम आहे. इगतपुरी,त्र्यंबकेश्वर,निफाड आदी ग्रामीण भागात पाऊस सुरुच आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायखेडा, चांदोरी भागातील स्थिती अद्यापही जैसे थे आहे. खेड भैरव:  येथे आज सकाळ पासूनच पावसासोबत वाऱ्याचा वेग वाढला. अनेक ठिकाणी घरांची पडझड तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे कोसळली .

 इगतपुरीत आज सकाळी पाऊस 61.00 मि. मि झाला तर आतापर्यत एकूण पाऊस 3929.00 मि. मि.ची नोंद झाली आहे. चणकापुर धरणातून ६५८१ क्युसेस तर पुनंद धरणातून ५३९१ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. अभोणा येथेही जोरदार पाऊस सुरु असून,जनजीवन विस्कळीत झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rain