परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची मनसेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नाशिक ः परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. 

नाशिक ः परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. 
मनसे जिल्हाध्यक्ष अनंत सुर्यवंशी, रतनकुमार इचम, शहराध्यक्ष अंकुश पवार, भाऊसाहेब निमसे, संदीप भवर, किशोर जाचक, नितीन साळवे,सिद्धांत मंडाले आदीच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिण्यात परतीच्या संततधार पावसामुळे द्राक्ष, कांदा, डाळींब, ज्वारी, बाजरी, मका, कपाशी, कडधान्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिशय मोठया प्रमाणात झालेले नुकसान व भविष्यात अतीव संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऐन दिवाळीत दिवाळे निघाले असून त्यामुळे शेतकऱ्यांवर सोसायटी बॅंकांचे कर्जाचा बोजा हा आणखी वाढणार आहे. त्यामुळे शासनाने नैसर्गिक आपत्ती घोषित करून सरकारने जबाबदारी म्हणून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करण्यात यावे व झालेले नुकसान हे नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rain