गिरणा परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

शिवनंदन बाविस्कर / दीपक कच्छवा 
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

चाळीसगाव परिसरात अवकाळी पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पिलखोड/मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - मंगळवारी (ता. 21) दिवभर ढगाळ वातावरण असलेल्या गिरणा परिसरात रात्री बेमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे कांद्याच्या रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

हवामान खात्याने काही दिवस बेमोसमी पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यानुसार सोमवारी (ता. 20) सकाळी पावसाने तुरळक हजेरी लावली होती. 

काल (मंगळवार) सकाळपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. रात्री साडे आठपासून पिलखोड, सायगाव, मांदुर्णे, वरखेडे, वरखेडे खुर्द, दरेगाव, लोंढे, मेहुणबारे, पिंपळवाड म्हाळसा, तिरपोळे, कृष्णापुरी तांडा आदी भागात पावसाने पंधरा मिनिटे ते अर्धा तास हजेरी लावली. शिवाय सायंकाळपासून आकाशात विजा चमकत होत्या.

अवकाळी पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शिवाय परिसरात आधीच बिबट्याच्या दहशतीमुळे शेतमाल पडून असल्यामुळे नुकसान होत आहे. तर अशा वातावरणामुळे वरखेडे परिसरात एक तास
वीज गायब होती.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 

Web Title: Marathi News rain in Girna area