इगतपुरी : बारा तासांत 46 मिलीमीटर पाऊस

विजय पगारे
शनिवार, 24 जून 2017

इगतपुरी : मुंबईसह राज्याच्या विविध भागात आणि विशेष करून कोकणात धुवाधार पावसाचे आगमन होताच पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपूरी शहरात वरुणराजाचे आज (शनिवार) संध्याकाळी पारंपरिक शैलीत शहर व परिसरात हजेरी लावली. या पावसामुळे भाताच्या रोपांना संजीवनी मिळाली असून गेल्या काही दिवसांपासून अपेक्षित अशा स्वरूपात आगमन झाल्यामुळे बळीराजाचा चेहरा खुलला आहे. या परिसरात 12 तासांमध्ये 46 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 

गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून पावसाने माहेरघरातच सर्वत्र हुलकावणी दिली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. आज मात्र पावसाने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत शहरासह हजेरी लावून तमाम शेतकऱ्याच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत

दरम्यान आज इगतपुरी शहर व परिसरासह पाश्चिम पट्टयातील  भावली ,मानवेढे, बोर्ली, पिंपरीसदो, नांदगावसदो, कारावाडी, अवळखेड, कारावाडी, घोटी, तळोशी, टाकेघोटी, बलायदुरी, त्रिंगलवाडी, बोरटेभें, टिटोली, मुंडे, गव्हांडे, पारदेवी, गिरणारे, तळेगाव चिंचलेखैरे, खैरेवाडी तसेच कावनई मुंढेगाव, मुकणे, साकुर, शेणीत, रायांबे, वाडीवहे, सांजेगाव, मुरंबी, टाकेद, खेड व इतर भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे पश्चिम पट्ट्यात व पूर्व भागासह दिलासा मिळाला असून ,भात शेतीला व भाताच्या रोपांना संजीवनी मिळाल्यामुळे शेतकरी बांधावामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसाची अशीच कायम कृपा राहीली तर रोपांची वाढ होण्यास मदत मिळून हंगामातील भात लागवडीला वेग येण्यास मदत होणार आहे. दरम्यान काल व आज झालेल्या पावसामुळे इगतपुरी शहरात व पारिसरात समाधानकारक वातावरण व गारवा कायम जाणवू लागला आहे.

Web Title: marathi news rain monsoon nashik igatpuri kokan