अजूनही 25 तालुक्‍यांना पावसाची प्रतिक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

नाशिक ः उत्तर महाराष्ट्रात चोवीस तासात 16.4 मि.मी पाउस झाला. विभागातील 54 तालुक्‍यापैकी सात तालुक्‍यांना अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यत 24 टक्के पाउस झाला आहे. गेल्या आठवड्यातील पावसामुळे 20 टक्केहून आधिक क्षेत्रावर खरीप पेरण्याची कामे उरकली आहेत. कापसासह खरीपाचा विचार केला तर, आतापर्यत 32 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तीन दिवसापासून उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक पाउस सुरु आहे. त्यामुळे पिक पेरण्यांना दमदार सुरुवात झाली आहे.

  खरीपांच्या पेरण्यांना उशीर झाला असला तरी, दमदार हजेरीमुळे पीक पेरण्यांना जोमाने सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील कापसाच्या क्षेत्रासह 3 लाख 19 हजार क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहे. यात कापसाचा विचार केला तर एकुण 8 लाख 35 हजार हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. जळगावला सर्वाधीक 52 टक्के तर नगरला जेमतेम 7 टक्के पेरण्या झाल्या आहेत. धरणांच्या साठ्यात अजूनही अपेक्षित वाढ झालेली नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rain not sufficient