वीज पडून महिला ठार 

वीज पडून महिला ठार 

जळगाव ः शहरासह जिल्ह्यात आज दुपारी झालेल्या परतीच्या पावसाने वीज पडून तळेगाव (ता. चाळीसगाव) येथील महिला ठार झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 18 ते 22 ऑक्‍टोबर दरम्यान वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. या पावसामुळे पिके धोक्‍यात येण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. 

जळगाव शहरात सकाळी ऊन पडले होते अचानक दुपारी ढगाळ वातावरण होऊन पाऊस झाल्यानंतर नागरिकांची एकच धांदल उडाली. दिवाळीनिमित्त अनेकांनी बाजारपेठेत उघड्‌यावर दुकाने लावली होती. पावसामुळे विक्रेत्यांनी दुकाने झाकून सुरक्षित ठिकाणी जाण्यावर भर दिला. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. बोदवड तालुक्‍यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. तोंडापूर (ता. जामनेर) येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. ग्रामीण भागात ज्वारी, मका, सोयाबीन तयार करण्याची कामे सुरू असल्याने पावसाने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. 

चाळीसगाव तालुक्‍यात हजेरी 
परतीच्या पावसाने आज दुपारी चाळीसगाव तालुक्‍यातील बहुतांश भागात हजेरी लावली. कृष्णानगर तळेगाव (ता. चाळीसगाव) शिवारात कौशल्याबाई गंगाराम चव्हाण (वय 55) ही महिला नातीला घेऊन आपल्या गट नंबर 196 मध्ये भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतात गेलेली होती. दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यानंतर भिजले जाऊ नये म्हणून त्या लिंबाच्या झाडाखाली थांबल्या. यावेळी त्यांची नात व सोबतची एक महिला देखील होती. अचानक विजेचा कडकडाट होऊन आकाशातून कौशल्याबाईच्या अंगावर वीज कोसळली. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. सुदैवाने सोबतच्या महिलेसह त्यांच्या नातीला कुठलीच इजा झाली नाही. कौशल्याबाईच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com