स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार-राज ठाकरे,जामीन मंजूर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

इगतपुरी शहर : इगतपुरी तालुक्यातील स्थानिक भूमीपुत्रांचा कारखान्यांमध्ये रोजगार मिळण्याचा हक्क कोणीही डावलू शकत नाही. भाताला हमीभाव देण्यासाठी आगामी काळात नियोजन करण्यात येईल. धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. इगतपुरी येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, या राज्यातील स्थानिक नागरिकांना इथल्या उद्योग धंद्यांमध्ये रोजगार मिळण्याचा हक्क आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाताला हमीभाव मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत.

इगतपुरी शहर : इगतपुरी तालुक्यातील स्थानिक भूमीपुत्रांचा कारखान्यांमध्ये रोजगार मिळण्याचा हक्क कोणीही डावलू शकत नाही. भाताला हमीभाव देण्यासाठी आगामी काळात नियोजन करण्यात येईल. धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. इगतपुरी येथे शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, या राज्यातील स्थानिक नागरिकांना इथल्या उद्योग धंद्यांमध्ये रोजगार मिळण्याचा हक्क आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भाताला हमीभाव मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. विस्थापित झालेल्या पीडितांना न्याय देण्यासाठी माहिती घेऊन काम करण्यात येईल. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक मुद्यांवर टीकेची झोड उठवली.

Web Title: marathi news raj thakre