राज यांचा नाशिकमध्येही उद्या "लाव रे तो व्हिडिओ',महायुतीला धास्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 एप्रिल 2019

नाशिक ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक प्रहार करत व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभर गाजत असलेल्या राज ठाकरे यांची शेवटची सभा शुक्रवारी (ता.26) सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होत आहे. या सभेत ते कोणता व्हिडिओ लावतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. विशेषकरून महायुतीमध्ये ठाकरे यांच्या सभेची सर्वाधिक धास्ती असल्याचे दिसून येत असून, सभेच्या नियोजनापासून गर्दीपर्यंत बारीक नजर ठेवली जात आहे. 

पक्ष लोकसभा निवडणूक लढवत नसला तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. राज यांच्या सभेचे आकर्षक वक्तृत्व शैलीबरोबरच व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोलखोल करत असल्याने मतदारांना त्यांचे भाषण भावत आहे. ठाकरे यांनी राज्यात दहा सभा घेतल्या. त्यातील शेवटची सभा शुक्रवारी नाशिकमध्ये होत आहे. 

Web Title: marathi news raj thakre sabha