राजधानी एक्‍स्प्रेसचे जोरदार स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

नाशिकः मध्य रेल्वेच्या नाशिक रोड मार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्‍स्प्रेसचे शुक्रवारी नाशिक रोड स्थानकावर स्वागत करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्वागत झाले. मुंबईहून पावणेअकराला निघालेली राजधानी एक्‍स्प्रेस दुपारी नाशिक रोड स्थानकावर थांबली. 

मध्य रेल्वेने विशेष राजधानी एक्‍स्प्रेस (02221) या मार्गावरून सुरु केली असून, तिला नाशिक रोड थांबा आहे. आठवड्यातून एकऐवजी चार दिवस ही गाडी या मार्गावरुन धावणार आहे. थेट दिल्लीला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी खासदार डॉ. भारती पवार (दिंडोरी), खासदार गोडसे, आमदार योगेश घोलप, मंडल वाणिज्य प्रबंधक बी. अरुणकुमार, नाशिक रोड स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, वाणिज्य निरीशक कुंदन महापात्रा आदींच्या उपस्थितीत राजधानी एक्‍स्प्रेसचे स्वागत करण्यात आले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rajdhani express