पशूवृत्ती अन्‌ मानवतेवर भाष्य करणारे "ड्रीम युनिर्व्हस' 

live
live

नाशिक-बदलत्या काळासोबत मनुष्याने प्रगती साधली आहे. पण या धकाधकीच्या जीवनात मानवीभाव, पर्यावरण याकडे दुर्लक्ष करताना हाच मनुष्य दुष्प्रवृत्तींना बळी पडत आहे. मनुष्यात वाढत चाललेली पशूवृत्ती आणि मानवता धर्म यावर "ड्रीम युनिर्व्हस' नाटकातून भाष्य करण्यात आले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या प्राथमिक फेरीत नाटकाचे सादरीकरण करण्यात आले... 

     मनुष्याच्या उत्क्रांतीपासून त्याची स्वप्ने अन्‌ स्वप्नपूर्तीची जिज्ञासा विलोभनीय अशीच आहे. स्वप्नांचे अवकाश सत्यात उतरविण्याच्या प्रयत्नात मानवतेपासून मानव दूर होत गेला आहे. दुसरीकडे निसर्गापासून निर्माण झालेला मानव, त्यालाच पायदळी तुडवून सत्ता गाजवू पाहत आहे. अंतराळ भेदून काळाच्या पोटातील रहस्यही जाणून घेण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. आजचा मानव खरच शोधांचा उपयोग मानवता आणि निसर्गाचे अस्तित्व टिकवण्यासाठी करतो आहे की यादवी, महायुद्धे, संहार, अतिरेकी हल्ले करून निष्पाप, दुर्बल मानवांचे रक्‍त आणि अश्रू वाहण्यासाठी करतो, याचा विचार करायला लावणारे हे नाटक आहे. 

विजय नाट्य मंडळ, पंचवटी यांच्यातर्फे सादर केलेल्या "ड्रीम युनिर्व्हस' नाटकाचे लेखक नेताजी भोईर असून, दिग्दर्शन वरुण भोईर यांनी केले आहे. नाटकात कृष्णा रघुवंशी (विजयचंद्र), राजेंद्र जव्हेरी (बाप्पाजी), अभिजित काळे (अचल), ओम शेवाळे (क्रांती), वसंत पांडे (जॉर्ज), स्वप्ना इंगळे (सुनीता व कल्पिता) आदींनी पात्र साकारली आहेत. नेपथ्य किरण भोईर, तर प्रकाश योजना रवींद्र रहाणे यांची आहे. संगीत अनंत पांडे यांनी दिले असून, रंगभूषा माणिक कानडे, सुरेश भोईर, वेशभूषा पूनम भोईर, संजय जरीवाले, तर नृत्यदिग्दर्शन संजय सोनार यांचे आहे. 

स्पर्धेचे दिमाखात उद्‌घाटन 
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 15) झाले. ज्येष्ठ रंगकर्मी सुनील देशपांडे, अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, सुनील ढगे, स्पर्धेचे समन्वयक राजेश जाधव, मीना वाघ आदी उपस्थित होते. नाटकाचे सादरीकरण सजगतेने, संवेदनशीलतेने केल्यास परीक्षक, प्रेक्षकांची स्पर्धकांना पसंती मिळते, तर स्पर्धेतील सादरीकरणासाठी स्पर्धकांना सहा हजारऐवजी दहा हजार रुपये इतकी रक्‍कम मिळायला हवी, अशी अपेक्षा श्री. कदम यांनी व्यक्‍त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com