मुर्छा पावला राक्षसरावो,तेणें वातें वृक्ष पहाहो...! 

सोमनाथ कोकरे
शनिवार, 24 मार्च 2018

नाशिक : जिंकीन क्षणार्धे! मज नसतांही अश्‍वरथा!! येकलाचि मारीन बहुतां!! ऐसे हनणोनि धनुष्यभाता!! घेतला वीरें! यापरि ऐकोनियां उत्तर!! मग तो बोलिला विदूर!! हनणे बाळा तुझा पुरुषार्थ थोर!! तो मीचि जाणें!! आता सिध्द आहे माझा रथ!! मूर्छा पावला राक्षसरावो!! तेणें वातें वृक्ष पहाहो....महाकाव्य असलेल्या रामायणात लक्ष्मणाला मुर्छा येऊन पडण्यापूर्वी आणि पडल्यानंतर संजीवनी बुट्टी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर जाण्यासाठी हनुमंताची धावपळ...यासारखं वर्णन जेष्ठ चित्रकार आनंद सोनार यांनी रेखाटलं आहे. आजच्या रामनवमीचे औचित्य साधून चित्तारलेली ही कलाकृती भाविकांच्या मनांचा वेध घेणारी आहे. 

जेष्ठ चित्रकार आनंद सोनार हे दरवर्षी प्रमाणेच खास "सकाळ'साठी श्रीरामनवमी निमित्ताने भारतीय अलंकारिक शैलीत श्रीप्रभू रामांच्या मांडीवरच्या लक्ष्मणास आलेली मुर्च्छा, व हनुमताने आणलेला द्रोणागिरी पर्वत हा युध्दभूमिवरील प्रसंग रेखाटला आहे. पंधरा वर्षापासुन सात्तत्याने श्री सोनार सकाळसाठी रामनवमी निमित्त एक प्रसंग रेखाटतात. आतापर्यंत रामायणातील श्री रामांच्या जीवनातील विविध प्रसंग त्यांनी रेखाटले आहेत. 

युध्दकाण्डांतील प्रसंगांची आठवण...
वाल्मिकी रामायणातील युध्दकाण्डात घडलेला हा एक प्रसंग.....चिंताग्रस्त प्रभूश्रीरामाच्या मांडीवर बेशुध्द अवस्थेतील लक्ष्मण, व तेवढ्यात हनुमानाने हातावर आणलेला महोदय (द्रोणागिरी) पर्वत, शेजारी वानरसेना हे दर्शवणारे चित्र आहे. त्यास सुबक अशी रंगसंगती, प्रसंगा नुसार केलेली चित्राची मांडणी हे याचे वैशिष्ठ आहे. या चित्राची संकल्पना अशी रावणपुत्र इंद्रजित आणि लक्ष्मण यांच्यातील युध्दात इंद्रजिताने ढगाआडून कपटाने लक्ष्मणावर शक्ती अस्त्राचा प्रयोग केला, त्यामुळे लक्ष्मणास मुर्च्छा आली. त्याच्या संरक्षणासाठी सर्व वानरसेना लक्ष्मणाभोवती गोळा झाली. बिभिषमाच्या सुचनेनुसार वैद्य सुषेण यांस युध्दभूमिवर पाचारण केले.         लक्ष्मणाच्या नाडी परीक्षणानंतर वैद्यराजांनी हिमालयातील संजीवनी सदृश वनस्पती आणण्याची सूचना केली. ही अवघड कामगिरी हनुमंताने त्वरीत स्विकारली. तो हिमालयातील महोदय (द्रोणागिरी) पर्वतावर पोहोचला. पण त्यास संजीवनी वनस्पतीची प्रत्यक्ष ओळख नसल्याने हनुमंताने महोदय (द्रोणागिरी) पर्वताची शिखरेच तळहातावर उचलुन आकाशमार्गे युध्दभूमीवर घेऊन आला. त्यातील योग्य ती वनस्पती शोधुन सुषेणाने लक्ष्मणावर उपचार केले. लक्ष्मण सावध झाल्याने सर्व वानरसेना आनंदली, लक्ष्मण उठलेला पाहुन श्रीप्रभू रामांनी आनंदाने लक्ष्मणास अलिंगण दिले. 

चित्रकार सोनार यांचे सातत्य प्रशंसनीय 
ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांनी दरवर्षी एक या प्रमाणे रामनवमी निमित्त रेखाटली आहेत, श्रीराम जन्मसोहळा, श्रीराम सिता स्वयंवर, श्रीराम पंचायतन, दशरथराजा व बालवयातील श्रीरामासह परिवार, श्रीरामाचे वनवासानंतरचे आयोध्येतील स्वागत, श्रीराम व लक्ष्मणास गंगापार करण्यासाठी केवट नावाड्याची मदत, सेतू बांधारे सागरी, मिथिली नगरीतील राम-सितेची पहिली भेट, कुशलव रामायण गाती अशी विविध आकर्षक चित्रे दरवर्षी श्रीरामनवमी निमित्त "सकाळ'मधुन प्रसिध्द झाली आहेत. त्याचे हे सातत्य निश्‍चितच प्रशंसनीय आहे. 

Web Title: marathi news ramayan laxan mruchya