उद्धव ठाकरेंची नाराजी भाजपनचे करावी दूर - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

नाशिक - आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वतंत्र लढविण्याने शिवसेना-भाजप असे दोघांचेही नुकसान होईल, म्हणूनच दोन्ही पक्षांनी रिपब्लिकन पक्षासमवेत निवडणुका लढवायला हव्यात, असा आपला आग्रह आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची नाराजी भाजपने दूर करायला हवी, असे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे भाजपने दिलेली राज्यसभेची "ऑफर' नारायण राणे यांनी स्विकारावी अन्‌ त्यांना केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशीही भूमिका मांडली. 

युतीने एकत्र निवडणूक लढवली आणि नाही लढवल्यास रिपब्लिकन पक्षाला नेमक्‍या किती जागा मिळाव्यात याचेही सूत्र आठवले यांनी जाहीर केले. लोकसभेसाठी युती झाल्यास दोन, न झाल्यास पाच, तर विधानसभेसाठी युती झाल्यास 15 आणि न झाल्यास 35 जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात, अशी आपली मागणी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या अभिवादन सभेसाठी आठवले नाशिकमध्ये आले होते. सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की कोरेगाव-भीमामधील घटनेच्या अनुषंगाने संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची चौकशी सुरू आहे. चौकशीत त्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यावर त्यांच्यावर कारवाई होईल. पोलिसांनी आता तपासाला वेग द्यायला हवा. खरे म्हणजे, बहुजनांनी गुण्यागोविंदाने राहावे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. दलित आणि मराठा समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यास कोणीही बळी पडू नये.

Web Title: marathi news ramdas athwale Uddhav Thackeray RPI Shivsena bjp