प्रियकराचा मित्र असल्याचे भासवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

जुने नाशिक : प्रियकराचा मित्र असल्याचे भासवून अहमदनगरच्या अल्पवयीन युवतीवर लैगींक अत्याचार (बलात्कार) केल्याची घटना रविवारी (ता.20) मध्यरात्री सिबीएस परिसरात घडली. पिडीत युवतीच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिसात अज्ञात संशयितांच्या विरुद्ध बलत्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

जुने नाशिक : प्रियकराचा मित्र असल्याचे भासवून अहमदनगरच्या अल्पवयीन युवतीवर लैगींक अत्याचार (बलात्कार) केल्याची घटना रविवारी (ता.20) मध्यरात्री सिबीएस परिसरात घडली. पिडीत युवतीच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिसात अज्ञात संशयितांच्या विरुद्ध बलत्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

पिडीत युवती काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील कारखेल येथील मावशीकडे राहण्यास होती. मावशीचा मुलाच्या मित्राचे मावशीच्या घरी सतत येणे जाणे असल्याने त्याची मैत्री झाली. काही दिवसानंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर दोघे सतत एकमेंकाना भेटत असत. शुक्रवारी (ता.18) अशाच प्रकारे दोघे प्रियकराच्या घराजवळील शेतात सांयकाळी पाचच्या सुमरास भेटले. प्रियकराच्या चुलल्याने दोघाना बघितले. रागावून दोघांना तेथून जाण्यास सांगितले.

राग येऊन सोडले घर

 पिडीता घरी उशीरा पोहचल्याने मावशीने तिला रागावले. त्याचा राग येवून पिडीताने घर सोडण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (ता.19) प्रियकरास फोन केला. मावशी रागावली म्हणून नाशिकला राहणाऱ्या त्याच्या चुलत भावाकडे जात असल्याचे सांगितले. प्रियकराने तीस जाण्यास विरोध केला. पण तिने स्वताकडे असलेल्या पैशाने अहमदनगरची बसमध्ये बसून नाशिक गाठले. जुने सिबीएस बस स्थानकावर रात्री दहाच्या सुमारास उतरली. प्रियकरास शहरात दाखल झाल्याचे सांगितले. त्याने नाशिकला थांब मी येत असल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर काही वेळातच मावशीच्या मोठ्या मुलाचा फोन आला. मावशीची तब्येत बिघडली आहे. तू शिर्डीची गाडी पकडून घरी निघून येण्याचे सांगितले. फोनवर बोलत असताना मोबाईलची बॅटरी संपल्याने पिडीताचा मोबाईल बंद पडला. ती बस स्थानकावरच शिर्डीच्या बसची वाट पाहत थांबली. रविवार (ता.20) रात्री 1 ते 2 च्या दरम्यान. एक अज्ञात युवक तिच्या जवळ आला. तू येथे का थांबली असे विचारले. तिने प्रिकराच्या भावच्या घरी जाण्याचे सांगीतले. त्यावर त्याने मी त्याचा मित्र आहे. तूला घेवून जाण्यासाठी आल्याचे सांगीतले. त्यावर विश्‍वास बसल्याने पिडीता त्याच्या दुचाकीवर बसली. संशयिताने  तिला बंद हॉटेलच्या आवारात घेवून गेला. त्याठिकाणी पिडीता ओरडू नये म्हणून तीचे तोंड दाबून तीच्यावर जबरदस्ती केली. तीने तेथे असलेल्या दगडाने त्याच्या डोक्‍यावर मारा करत त्याला जख्मी करत तेथून पळ काढला. अंधाराची संधी साधत हॉटेलच्या आवारातील एका कोपऱ्यात लपून राहिली. त्याने शोध घेतला. ती त्यास मिळून आली नाही. तो तेथून निघून गेला. घाबरलेल्या आवस्थेत पिडीता पुन्हा सिबीएस स्थानकवर जावून बसली. त्यावेळे सुमारे तीन वाजेच्या सुमारास सरकारवाडा पोलिस त्याठिकाणी आले. पोलिस ठाण्यात घेवून जात तीची चौकशी केली. तिने घडलेला प्रकार पोलिसाना सांगितला. 

Web Title: marathi news rape case