रावळगाव कारखान्याचा गळीत हंगामास उत्साहात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मालेगाव-; रावळगाव ( मालेगाव ) येथील एस. जे. शुगर  साखर कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामास बुधवारी ( ४ ) उत्साहात प्रारंभ झाला. कारखान्याचे मार्गदर्शक आमदार भाई जयंत पाटील यांचे पुत्र नृपाल पाटील, अध्यक्ष तुषार गोसावी, संचालिका मीरा घाडीगावकर, सरव्यवस्थापक भगवान पाटील आदींसह उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला.

मालेगाव-; रावळगाव ( मालेगाव ) येथील एस. जे. शुगर  साखर कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामास बुधवारी ( ४ ) उत्साहात प्रारंभ झाला. कारखान्याचे मार्गदर्शक आमदार भाई जयंत पाटील यांचे पुत्र नृपाल पाटील, अध्यक्ष तुषार गोसावी, संचालिका मीरा घाडीगावकर, सरव्यवस्थापक भगवान पाटील आदींसह उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून शुभारंभ करण्यात आला.

खाजगी क्षेत्रातील देशात अव्वल असलेल्या रावळगावच्या चिमणीचा धूर पाच वर्षांच्या कालखंडानंतर गेल्या वर्षांपासून पुन्हा निघण्यास सुरवात झाली. पहिल्या यशस्वी हंगामानंतर बुधवारी दुसऱ्या हंगामाला सुरवात झाली. सत्यनारायण पूजेनंतर गव्हाण पूजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गव्हानीत ऊसाची मुळी टाकण्यात आली. भोंग्याच्या आवाजानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. यावेळी ऊस तोडणी मुकादम मनोहर चव्हाण, रामचंद्र चव्हाण, ऊस उत्पादक शेतकरी साहेबराव गांगुर्डे, सुरेश भदाणे, पांडुरंग पवार, नरेंद्र गावित, सय्यद गफ्फार, भास्कर निकम, भरत सोनवणे, खेमराज सोनवणे, विजय पाटील, कारखान्याचे आधिकारी उमेश पाटील, दिलीप पवार ,शांतीलाल शेलार, लक्ष्मण ढोमसे,आदींसह शेतकरी, ऊसतोडणी मुकादम, कामगार, ट्रक चालक-मालक, पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ बहुसंख्यने उपस्थित होते.

नक्की वाचा- तु्म्हीही म्हणा...मी पुन्हा येईन

शेतकऱ्यांकडून हमी
ऊस तोडणी मुकादम व शेतकऱ्यांनी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रावळगाव कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा केला जाईल असे सांगत अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी नवीन ऊसाची लागवड केल्याचे सांगितले.

रावळगावला पुनरवैभव मिळुवून देण्याकडे आमची वाटचाल सुरू आहे. या भागातील शेतकऱ्यांसह सर्वच घटकांचे सहकार्य मिळत आहे. कारखाना सुरू झाल्यामुळे शेकडो जणांना रोजगार मिळाला आहे.
-आमदार भाई जयंत पाटील, मार्गदर्शक

ऊस उत्पादक शेतकरी, कामगार व कारखाना व्यवस्थापन या त्रिसूत्रीच्या बळावर गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही गळीत हंगाम यशस्वी होईल. आमदार भाई जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी, कष्टकरी घटकांना न्याय दिला जाईल. येत्या काही वर्षात रावळगाव व परिसराचा पूर्णतः कायापालट झालेला असेल.
-.मीरा घाडीगावकर, संचालिका, एस. जे. शुगर

रावळगाव कारखान्यावर शेकऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे पहिला हंगाम यशस्वी झाला. यावर्षी अडीच ते तीन लाख टन ऊसाचे गाळप होईल. सर्वच भागातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- भगवान पाटील, सर व्यवस्थापक एस. जे. शुगर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ravalgaon factory