नैसर्गिक आपत्तीत राजकारण नको : महाजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

रावेर : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्यात विनाकारण वाद निर्माण करून त्यांचा दौराच रद्द करण्याचा सोपान पाटील यांचा घाट होता. शेतकऱ्यांवर इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती आली असताना यात राजकारण करू नये असे आवाहन जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले आहे. 

रावेर : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दौऱ्यात विनाकारण वाद निर्माण करून त्यांचा दौराच रद्द करण्याचा सोपान पाटील यांचा घाट होता. शेतकऱ्यांवर इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती आली असताना यात राजकारण करू नये असे आवाहन जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी केले आहे. 

मंत्री महाजन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्यात पाडळा येथे झालेल्या वादविवादाच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
श्री. महाजन म्हणाले की, सोपान पाटील यांना दौऱ्यात आदरपूर्वक सामील करून घेतले. मात्र आधी केऱ्हाळा येथे सोपान पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर श्री. महाजन यांना उद्देशून तुम्ही कशासाठी आलात? पालकमंत्र्यांनी यायला हवे होते, तुम्ही काय करणार? असे प्रश्न उपस्थित केले. 
श्री. महाजन यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठविले आहे, नुकसान भरपाईचा निर्णय तेच घेणार आहेत. मात्र सोपान पाटील यांनी पुन्हा पाडळा येथे तोच मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे. तुम्ही यात राजकारण आणू नका असे श्री महाजन यांनी सांगितल्यावर देखील सोपान पाटील यांनी न ऐकल्याने अखेर मंत्री महोदयांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. 

सोपान पाटलांनी अफवा पसरविली 
सोपान पाटील यांनी सोशल मीडियावर अफवा पसरविली आहे. ते शेतकरी नाही, त्यांचा रेशनचा आणि आडतचा व्यवसाय आहे. आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री आले होते, मात्र त्यांनी काहीही मदत शेतकऱ्यांना केली नाही. युती सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी तत्काळ हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत केली होती असेही श्री. महाजन म्हणाले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, सरचिटणीस वासुदेव नरवाडे उपस्थित होते.

Web Title: marathi news raver aaptti mahajan