केळी उत्पादकांवर दुहेरी संकट! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

वेर : आजचा दिवस केळी उत्पादकांसाठी दुहेरी नुकसान करणारा ठरला. एकीकडे राजस्थान, पंजाब, मध्यप्रदेशात तेथील शेतकऱ्यांनी केलेल्या संपामुळे जिल्ह्यातील सुमारे शंभर केळीचे ट्रक तिथे पोचूनही ते बाजार समितीत प्रवेश करू शकले नाही. यामुळे सुमारे दीड कोटी रुपयांची केळी प्रचंड उष्णतेने खराब होण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे आज (ता. 1) सायंकाळी तालुक्‍याच्या उत्तर-पूर्वेकडील 10-11 गावांना चक्रीवादळाने झोडपले. या गावातील सुमारे एक हजार हेक्‍टर केळी क्षेत्राचे सुमारे 5 ते 7 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. संपासह, वादळाचा असा एकूण दहा कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. 

आजपासून शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. राजस्थान, पंजाब आणि मध्यप्रदेशात या संपाचा प्रभाव अधिक आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर, पंजाबमधील अमृतसर,जालंधर, लुधियाना, मध्यप्रदेशातील इंदूर या ठिकाणी आंदोलनाची तीव्रता जास्त होती. तिथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तेथील बाजार समितीच्या आवारात केळीच्या ट्रक्‍सना प्रवेश करू दिला नाही. प्रवेशद्वार उघडूच दिले नाही अशी माहिती केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दिली. 
लिलाव होऊ न शकलेल्या ट्रॅक्‍सची संख्या सुमारे शंभर आहे. या ट्रक्‍स मधील सुमारे पंधराशे टन केळी (अंदाजे किंमत दीड कोटी रुपये) आज विक्री न होता तशीच ट्रॅक्‍समध्ये आहे. इतक्‍या उष्ण तापमानात केळी काळी पडून तिचा ताजेपणा कमी होणार आहे. संप लांबल्यास ही सर्व केळी खराब होऊन नुकसान होणारच आहे पण जिल्ह्यातून आणखी किमान दोन अडीचशे ट्रक्‍स रोज भरून जातात त्यापैकी आणखी काही ट्रक्‍स या संपात सापडून नुकसान होण्याची भीती आहे. 
 
वादळाने मोठे नुकसान 
आज सायंकाळी तालुक्‍याच्या सातपुड्याच्या लगत असलेल्या उत्तर-पूर्वेकडील 10-12 गावात सायंकाळी आलेल्या पाऊस आणि चक्री वादळाने केळीची झाडे उन्मळून पडली. यात खानापूर, निरुळ, पाडळा, केऱ्हाळा, चोरवड, अहिरवाडी, करजोद, भोकरी, वाघोड, पिंप्री, मंगरूळ, रसलपूर आदी गावांचा समावेश आहे. या गावातील सुमारे एक हजार हेक्‍टर क्षेत्रातील केळीचे किमान 5 ते 7 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात केऱ्हाळा गावांतील सुमारे पाचशे हेक्‍टर केळीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वादळासह आलेल्या पावसाने रावेर-बऱ्हाणपूर आणि रावेर-पाल रस्त्यावर झाडे कोसळून वाहतूक सुमारे दोन-तीन तास ठप्प होती.

Web Title: marathi news raver mansun banana