मंत्री महाजनांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासोबतच बाचाबाची 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

जळगाव ः जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीचे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आले असता, मंत्री महाजन व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. 

रावेर तालुक्‍यातील पाडळा शिवारात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना सदरचा प्रकार आज घडला. राष्ट्रवादीचे सोपान पाटील यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील का नाही आले? त्यांनीच यायला हवे होते; असे वारंवार बोलत होते. पाटील यांच्या वारंवार बोलण्यावरून मंत्री महाजन संतापले, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माझी बैठक झाली असून त्यांच्या निर्देशानुसारच मी आलो असल्याचे सांगितले. तसेच तुम्ही आमच्या या दौऱ्यात कसे काय? असे विचारत त्यांनी सोपान पाटील यांना आमच्यातून निघून जा, माझ्याशी बोलू नको म्हणून दम भरला. शिवाय, मंत्री महाजन यांनी एकेरी शब्दांचा वापर करीत धक्काबुक्की करीत सोपान पाटील यांना बाहेर काढले. अशा वेळी राजकारण करू नये असेही महाजन म्हणाले. यावेळी तिथे एकच खळबळ उडाली. आमदार हरिभाऊ जावळे, सुरेश धनके, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सोपान पाटील यांना समजाविण्याचा प्रयत्न केला; परंतू सोपान पाटील हे बाहेर न पडता महाजनांच्या पाहणी दौऱ्यातच सहभागी राहिले. 
 
Web Title: marathi news raver mantr girish mahajan