केळीसाठी अमेरिकी कंपनी तांदलवाडीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

रावेर (जि. जळगाव) - जागतिक केळी निर्यातीत सुमारे 25 टक्के वाटा असलेली अमेरिकेची "चिकिता' ही कंपनी केळी खरेदीसाठी थेट तांदलवाडी (ता. रावेर) येथे पोचली आहे. या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या आगमनामुळे येथील दर्जेदार आणि निर्यातक्षम केळी उत्पादन, हाताळणी आणि पॅकेजिंगवर या कंपनीनेही मान्यतेची मोहोर उमटवली आहे. सुमारे 80 टन केळी या कंपनीने खरेदी केली आहे.

तांदलवाडी येथून रोज सुमारे दोन हजार क्विंटल केळी अरब देशांत निर्यात होत आहे. आतापर्यंत अरब देशांत केळी निर्यातीसाठी अनेक छोट्या मोठ्या कंपन्या, व्यापारी येथे आले आहेत; पण "चिकिता' ही आंतरराष्ट्रीय कंपनी आल्याने येथे विशेष आनंद होत आहे. याबाबत बोलताना प्रगतिशील शेतकरी प्रेमानंद महाजन म्हणाले, की आपल्या येथील केळीची गुणवत्ता उच्च दर्जाची आहेच; पण कापणीनंतरची हाताळणी आणि पॅकेजिंगही उच्च दर्जाचे होत असल्याने जागतिक पातळीवरील कंपन्या आपल्याकडे येऊ लागल्या आहेत. ही येथील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब आहे.

दोनशे रुपये जादा भाव
सध्या केळीला क्विंटलला बाराशे, साडेबाराशे रुपये भाव मिळत आहे. अन्यत्र यापेक्षा जास्त भाव मिळत नाही. मात्र, तांदलवाडी येथून निर्यात होणाऱ्या केळीला दीडशे-दोनशे रुपये क्विंटलप्रमाणे जादा भाव देण्यात येत आहे.

Web Title: marathi news raver news banana american company tandalwadi