जळगाव जिल्ह्यात पावसाचे आगमन; एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

जळगाव ः मान्सुनपुर्व अवकाळी पावसाचे जिल्ह्यातील रावेर तालुक्‍यात जोरदार आगमन झाले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अंगावर झाड पडल्याने एका जणाचा मृत्यू झाला. 

जळगाव ः मान्सुनपुर्व अवकाळी पावसाचे जिल्ह्यातील रावेर तालुक्‍यात जोरदार आगमन झाले. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अंगावर झाड पडल्याने एका जणाचा मृत्यू झाला. 
पावसाचे यंदा लवकर आगमन झाले आहे. केरळमध्ये पावसाचे आगमन झाले असून, राज्यात देखील ठिकठिकाणी पाऊस झाला. आज सायंकाळी जिल्ह्यात मान्सुनला नसला तरी अवकाळी पावसाने वाऱ्यासह हजेरी लावली. रावेर तालुका परिसरात आज सायंकाळी साडेपाच- सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस झाला. वाऱ्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. यात अंगावर झाड पडल्याने एका जणाचा मृत्यू झाला आहे. शिवाय, वादळी वाऱ्यामुळे केळीचे झाडे देखील पडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदील झाला. 

Web Title: marathi news raver vadli vara pavus