रवीनाची अनोखी मोबाइल क्‍लिक क्‍लिक.... 

आनंद बोरा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

नाशिक : रवीना माळवे...एक आदिवासी तरुणी...या मुलीने आपल्यामधील छायाचित्रण कला जिवंत ठेवली. तिला त्यामध्ये करिअर देखील करायचे आहे. माजी मंत्री आणि वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या घरासमोर सतरा वर्षापूर्वी एक आदिवासी महिला आली आणि माझी मुलगी खूप आजारी आहे तिला वाचवा...असे म्हणून ती त्या मुलीला तिथेच टाकून निघून गेली. दादांनी आणि त्यांच्या पत्नीने ताबडतोब दवाखान्यात नेऊन उपचार केले आणि ती जगली...आज हीच मुलगी याच ठिकाणी राहते. विनायकदादा तिला मुलीचे प्रेम लावून शिकवत आहेत. बायफ मित्रा संस्थेच्या माध्यमातून तिची आदिवासी पाड्यांवर प्रदर्शने भरवून त्याद्वारे प्रबोधनही केले जात आहे. 

रविनाची दहावी झाली. तिने टेलरिंग आणि ब्युटीशियनचा कोर्स देखील केला. पण ती मुलगी रमते ती वेगळ्याच दुनियेत... चार वर्षाची असतांना तिने विनायकदादांचा मोबाईल घेतला आणि गंमतीने एका फुलाचा फोटो काढला. आणि मग तिने मोबाईल मधील कॅमेराने निसर्ग टिपायला सुरवात केली आज ती सतरा वर्षाची आहे. या तेरा वर्षात ती स्वतः कॅमेरातील फोटो कसा काढायचा, कोणता अँगल घेतला पाहिजे, सूर्यप्रकाश किती हवा हा विचार ती स्वतः करून फोटो क्‍लिक करीत असते.

विनायकदादा घरी आले कि त्यांचा मोबाईल ही मुलगी घेते आणि परसबागेतील पक्षी, फुलपाखरे, फुले, कीटक ती टिपत असते तिला तिच्या परसबागेमध्ये कोण कोणते पक्षी केव्हा येतात हे देखील माहित आहे. किती जातीचे पक्षी या परसबागेत आहेत हे ती पटकन सांगते. ज्या आदिवासी भागात मोबाईल काय असतो हे माहित नसतांना रवीनाने आपल्यातील कला मोबाईलमधील कॅमेरामधून पुढे घेवून आली आहे. तिची आई त्याकाळातील कबड्डी चॅम्पियान होती पण आर्थिक परिस्थिती नसल्याने गाव सोडून शहरात कामाला यावे लागले. तिला सर्व सोडावे लागले रवीनाने शेकडो निसर्ग फोटो काढले आहेत या छायाचित्रांचे कुसुमाग्रज स्मारकात प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते. तिचे छायाचित्र "बायफ मित्रा' या संस्थेतर्फे आदिवासी पाड्यांवर प्रदर्शन भरवून शालेय शिक्षणापलीकडील कौशल्य मुलांना दाखविली जातात. आज समाजात अनेक कलावंत मुले मुली आहेत त्यांना वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्‍यक आहे 

Web Title: marathi news ravoina girl clink click

टॅग्स