प्रशासनावर 'खासगी वॉच'ला महसूल कर्मचाऱ्यांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाशिकः राज्य शासकीय कर्मचाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी खाजगी एजन्सी नेमण्याच्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घोषणेनंतर महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र 
भावना आहे. शासकीय यंत्रणेवर अविश्‍वास दर्शविणाऱ्या या कृतीला तीव्र विरोध करण्याचा इशारा दिला आहे. 

महसूल मंत्री पाटील यांनी बुधवारी (ता.11) जिल्हातील महसूल आढावा बैठक घेतली. नियोजन भवनातील या बैठकीत, कोल्हापूर येथील उदाहरण देत, लाच लूचपत 
प्रतिबंधक विभागाचे सर्वाधीक साफळे महसूल विभागात लागतात. त्यामुळे लोकाभिमुख कामकाज करतांना सरकारी कामकाजातील भष्ट्राचार थांबविण्यासाठी खासगी संस्थाचे वॉच ठेवण्याचा इशारा दिला होता.

महसूल मंत्र्याच्या या इशाऱ्याच्या महसूल कर्मचाऱ्यांत प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र जगताप यांनी हा प्रकार धक्कादायक असून कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करणारा आहे.

राज्य शासनाची ही घोषणा म्हणजे कर्मचारी वर्गाची मानसिक खच्चीकरण करून ताणतणाव निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार असल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने केला आहे. 

Web Title: marathi news revenu commisioner