रस्त्याला अडथळा ठरल्याने  27 वाहनांवर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

जुने नाशिकः रस्त्याला अडथळा ठरल्याप्रकरणी 27 वाहनांवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोटपांतर्गत 18 जणांवर कारवाई करत दंड वसूल केला. शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनतळासाठी जागा नसल्याने भररस्त्यात वाहने उभी करणे, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, प्रवेशबंदीसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे यांसारख्या प्रकारामुळे वाहतूक कोंडीत आणखीच वाढ होत आहे. अशा बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला आहे. भद्रकाली पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून अशाच प्रकारची कारवाई सुरू केली आहे.

जुने नाशिकः रस्त्याला अडथळा ठरल्याप्रकरणी 27 वाहनांवर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोटपांतर्गत 18 जणांवर कारवाई करत दंड वसूल केला. शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनतळासाठी जागा नसल्याने भररस्त्यात वाहने उभी करणे, विरुद्ध दिशेने वाहने चालविणे, प्रवेशबंदीसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे यांसारख्या प्रकारामुळे वाहतूक कोंडीत आणखीच वाढ होत आहे. अशा बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला आहे. भद्रकाली पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून अशाच प्रकारची कारवाई सुरू केली आहे. सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसांत भद्रकाली पोलिसांनी द्वारका, सारडा सर्कल, शालिमार, मुंबई-आग्रा रोड अशा विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. रस्त्याला अडथळा ठरणारे आणि प्रवेशबंदी असलेल्या भागातून वाहन चालविणाऱ्या बेशिस्त वाहनाधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दोन दिवसांत तब्बल 27 वाहनधारकांवर कारवाई केली. त्याचप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे कोटपा कायद्यांतर्गतही पोलिसांनी या दोन दिवसांत 18 जणांवर धूम्रपान करून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण केल्याने कारवाई झाली. त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयांप्रमाणे तीन हजार 600 रुपयांचा दंड वसूल केला. 
 

Web Title: marathi news road accident crime