हिरवळीने नटले रान  अन्‌ रस्त्यांच्या कडा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

मालेगाव ः शहरासह तालुक्‍यात यावर्षी जवळपास सरासरीच्या दोनशे टक्के पाऊस झाला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला. पिकांचे अतोनात नुकसान झाले. दुसरीकडे डोंगरदऱ्या, रानमळे, पडित जमिनी हिरव्यागार झाल्या आहेत. पानवेली, काटेरी झुडपे व लहान-मोठ्या झाडाझुडपांनी विविध रस्त्यांच्या कडा व्यापून टाकल्या आहेत. माळरानाने जणू हिरवा शालू पांघरल्याचे दिसत आहे. 

हिरव्यागार निसर्गामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निकाली निघाला आहे. ग्रामीण भागात अजूनही लहान-मोठ्या नद्या, नाले व तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. दमदार पाऊस व साचलेल्या पाण्यामुळे गवत, पानवेली व झाडेझुडपे वाढली असून, सर्वत्र हिरवळ दिसत आहे. डोंगरदऱ्या हिरवळीने नटल्या आहेत. लहान-मोठ्या सर्वच रस्त्यांच्या दोन्ही बाजू पानवेली व काटेरी झुडपांनी वेढल्या आहेत. पाऊस खरिपाला हानिकारक ठरला, तरी तालुक्‍यातील नैसर्गिक सौंदर्य खुलवून गेला आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news road in rain