राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबध्द संचलनाने वेधले लक्ष

live
live

नाशिकः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मध्य नाशिक,म्हसरूळ,पंचवटी, इंदिरा नगर,कॉलेजरोड,नाशिकरोड, इंदिरानगर गटातर्फे  आज शहर परिसरात शानदार संचलन करण्यात आले. या शिस्तबध्द संचलनाने साऱ्याचे लक्ष वेधले. डॉ.सागर मंडलीक प्रमुख पाहुने होते. आर. के. लॉन्स येथून निघालेल्या संचलनात सुमारे 290 पूर्ण गणवेशातील बाल , तरुण व प्रौढ स्वयंसेवकांनी आपला शिस्तबद्ध सहभाग नोंदवला .शहरातील संख्या त्या-त्या भागात राहणारे स्वयंसेवक सहभागी झाले होते. ड्रम , बिगुल , बासरी , झांझ , त्रिभुज आदी वाद्य रचनांच्या सुरेल वादनाने , तसेच संपुर्ण गणवेशात शिस्तबद्ध रीतीने संचलन करणाऱ्या स्वयंसेवकांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी परिसरात सडा , रांगोळी तसेच पुष्पवृष्टीने संचालनाचे स्वागत करण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com