आरटीई प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला 

residentional photo
residentional photo

नामपूर :  डिसेंबर महिन्यात सूरु होणारी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यभरातील शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया तब्बल दोन महिन्यांच्या विलंबाने मुहूर्त सापडला आहे. प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण संचालकांकडून जाहीर करण्यात आले असून  पालकांना २५ फेब्रुवारी ते ११ मार्च याकाळात ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर प्रवेशाची पहिली सोडत १४ मार्चला जाहीर होईल. गत वर्षी डिसेंबरमध्ये प्रवेशप्रक्रिया सूरु होऊनही राज्यात ५१ हजार जागा रिक्त होत्या. तरीही यंदा शिक्षण विभागाला कसलेही सोयरेसुतक नसल्याने शिक्षणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. 
                   ग्रामीण व शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण हक्क कायद्यान्वये खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये एकूण क्षमतेच्या २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले जातात. प्रवेशपात्र विद्यार्थ्याना शाळेने गणवेश, पुस्तके, शैक्षणिक साहित्य आदी सुविधा मोफत देणे कायद्याने बंधनकारक आहे. शिक्षण विभागाने गतवर्षी प्रयत्न करुनही अकार्यक्षम सर्वर, जाचक अटी व अडीअडचणीमुळे राज्यात ५१ हजार ८४३ जागा जागा रिक्त राहिल्या आहेत. नाशिक जिल्हयात ७० टकक्याहुन अधिक गरजू विद्यार्थ्याना आरटीई मोफत प्रवेशाचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे यंदा  शिक्षण विभागाने व्यापक स्वरुपात पालकांचे प्रबोधन करुन प्रवेश प्रक्रिया राबवावी, अशी मागणी शिक्षणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. 
         

      गेल्या वर्षी आरटीई प्रवेशासाठी चार फेरया घेण्यात आल्या, तरीही राज्यात जवळपास ४२ टक्के जागा शिल्लक राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब, संस्थाचालकांची आडमुठी भूमिका, पालकांचा अडाणीपणा, सर्वरमध्ये वारंवार होणारा बिघाड, कागदपत्रांसाठी होणारी पालकांची दमछाक, पालकांमधील जनजागृतीचा अभाव आदी अनेक करणांमुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्हयाचे काम प्रगतीपथावर असल्याने  जिल्हयात १०० टक्के विद्यार्थ्यांना निवडीसाठी पात्र करूनही पालकांच्या प्रतिसादाअभावी ७२ टक्के प्रवेश पूर्ण झाले. सर्वरमध्ये वारंवार होणाऱ्या कुर्मगतीमुळे प्रवेशप्रक्रिया खोळबत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या असून यंदा शिक्षण विभागाने सर्वर क्षमता वाढवावी अशी मागणी होत आहे. 
           

      साधारणता आरटीईची  प्रवेशप्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून सूरु केली जाते. यासाठी सुमारे सात महिन्यांचा अवधी मिळूनही मोफत प्रवेशाच्या हजारो जागा रिक्त राहतात, हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू होत नसल्याने पालक प्रवेश नाकारतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. यंदा तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात प्रक्रिया सूरु होणार असल्याने हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिना उजाडता कामा नये, अशी अपेक्षा आहे. 


आरटीई अंतर्गत ग्रामीण भागातील गरीब, विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून उत्तम दर्जाचे मोफत शिक्षणाची संधी असली तरी प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी, विलंबाने सूरु होणारी प्रवेश प्रक्रिया, संस्थांचा दुटप्पीपणा अशा अनेक अडचणी आहेत. प्रवेश प्रक्रिया लांबल्याने पालकांना जून महिन्यात अन्य शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. जून महिन्यापूर्वी शंभर टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
फोटो वापरने 
प्रमोद लोखंडे, अध्यक्ष सुजाण पालक मंच 


आरटीई प्रवेशाची २०१८ मधील राज्यातील स्थिती : 
* एकूण शाळा – ८,९७६
* एकूण प्रवेश क्षमता – १,२६,११७
* एकूण अर्ज संख्या – १,९९,०५९
* एकूण प्रवेश पूर्ण – ७४,२७४ 
* एकूण रिक्त जागा :  
५१,८४३  


* आरटीई प्रवेशाची २०१८ मधील  जिल्हयाची स्थिती : 
* एकूण शाळा : ४६६
* एकूण प्रवेशक्षमता : ६,५८९ 
* एकूण अर्ज : ११,११८ 
* झालेले प्रवेश : ४६४६ 
* रिक्त जागा : २,१४३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com