LOKSABHA ELECTION 2019-महालेंच्या प्रचारासाठी बुधवारी  पवारांची नांदगावला प्रचारसभा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

नांदगाव-मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व स्टार प्रचारक शरद पवार यांची 10 एप्रिलला जाहीर सभा होणार आहे. नांदगावच्या शिवस्फूर्ती मैदानावर सायंकाळी पाचला ही सभा होणार आहे.

सभेसाठी मविप्र महाविद्यालयाच्या ग्राउंडवर हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनंतर श्री. पवार यांची नांदगावला जाहीर सभा होणार आहे. पुलोद काळात मुख्यमंत्री असताना श्री. पवार यांची नाग्यासाक्‍या धरणाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जंगी सभा झाली होती. त्यानंतर आता निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर त्यांचे शिवस्फूर्ती मैदानात आगमन होणार आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनामासत्रामुळे पक्षीय पातळीवर त्याचे पडसाद उमटले होते. आता थेट पक्षाध्यक्षच नांदगाव भेटीवर येत असल्याने श्री. पवार यांच्या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
Web Title: marathi news SABHA