कचऱ्याऐवजी माती... वजन वाढविण्यासाठी अनोखी शक्कल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

जळगाव ः शहरात अस्वच्छेतेची सर्वत्र बोंबाबोब होत असताना सफाई ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी चक्क माती भरून ती घंटागाडीत भरण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मक्तेदाराच्या कामाबाबत संशय निर्माण झाला आहे. 

जळगाव ः शहरात अस्वच्छेतेची सर्वत्र बोंबाबोब होत असताना सफाई ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी चक्क माती भरून ती घंटागाडीत भरण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मक्तेदाराच्या कामाबाबत संशय निर्माण झाला आहे. 
महापालिकेने शहरातील दैनंदिन स्वच्छता, कचरा संकलनासाठी पाच वर्षांसाठी 75 कोटींचा ठेका "वॉटर ग्रेस' कंपनीला दिला आहे. ठेका सुरू होण्याच्या काही दिवसांपासूनच मक्तेदाराच्या कामाबाबत महापालिकेच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यात कचऱ्याऐवजी माती घंटागाडीत भरताना शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी प्रकार उघड केला होता. यावर महापालिकेने मक्तेदाराच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. परंतु, मक्तेदाराच्या कामात सुधारणा होत नसून, पुन्हा बजरंग बोगद्यात बुधवारी सफाई कर्मचारी घंटागाडीत बोगद्याच्या बाहेरील पडलेली माती भरत असल्याचा प्रकार समोर आला. 

वजन वाढविण्यासाठी प्रकार 
मक्तेदाराला संकलित कचऱ्याचे वजन करून बिल दिले जाते. परंतु, मक्तेदाराकडून बिलात रक्कम वाढविण्यासाठी कचऱ्यात माती भरून त्याचे वजन वाढविण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. त्यात दीड कोटींची बिले महापालिकेने दिल्यावरून शिवसेनेने बुधवारी आंदोलनातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news safai worker wait soil gantagadi jalgaon