सेप्टीक टॅंकची थेट जोडणी मलवाहीकेला जोडणे बंधनकारक,मे अखेर पर्यंत मुदत  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

नाशिक : महापालिकेने शहरात ज्या भागामध्ये मलवाहीकेचे जाळे निर्माण केले आहे त्या मलवाहीकेला ईमारती, बंगलो, रो-हाऊसेसच्या सेप्टीक टॅंकची जोडणी बंधनकारक करण्यात आली असून त्यासाठी 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पालिकेच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. शहरातील नद्या प्रदुषण मुक्त करण्याबरोबरचं आरोग्याच्या दृष्टीने सदरचा निर्णय महत्वाचा आहे. 

शहराचा विस्तार वाढतं असताना आरोग्याच्या समस्या देखील तितक्‍याच प्रमाणात निर्माण होत आहे. आरोग्याच्या समस्यांच्या अनेक कारणांपैकी एक कारण सेप्टीक टॅंकचे सांगितले जाते. महापालिकेने शहरात सुमारे 1584 किलोमीटरचे मलवाहीकांचे जाळे निर्माण केले आहे. या मलवाहीका आठ सिवरेज झोन मध्ये विभागण्यात आल्या आहेत.

आठ सिवरेज झोन पैकी चार मलनिस्सारण केंद्र कार्यान्वित असून गंगापूर व पिंपळगाव खांब मलनिस्सारण केंद्राचे काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील सर्वचं मलजलवाहीका मधून सुमारे 280 दशलक्ष लिटर्स मलजल वाहून आणले जाते.
 मलनिस्सारण केंद्रांवर प्रक्रिया केल्यानंतर शुध्द झालेले प्रक्रिया युक्त सांडपाणी नदीपात्रामध्ये सोडले जाते. शहरात तयार होणारे मलजल शंभर टक्के संकलित करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने ज्या विकसित भागात मलवाहीकांचे जाळे नाही त्या भागात मलवाहीका तातडीने टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

अंदाजपत्रकामध्ये तरतुद देखील करण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त ज्या भागात मलजलवाहतुकीचे जाळे आहे त्या भागातील शंभर टक्के सिवेज गोळा करण्याच्या दृष्टीने ईमारत, बंगले व रो-हाऊसेस धारकांना मलवाहिकांना सेप्टीक टॅन्कची थेट जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
मलवाहीकेचे जाळे अद्याप कार्यान्वित नाही त्या भागात नवीन मलवाहीका टाके पर्यंत सेप्टीक टॅंकचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या मलवाहीकांना सेप्टीक टॅंकची जोडणी करण्यासाठी 31 मे 2018 पर्यंत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुदत दिली आहे. 
 
Web Title: marathi news safty tank connection..