सकाळ फुड फेस्टीव्हल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

सकाळ फुड फेस्टिव्हलच्या शाकाहारी, मांसाहारी मेजवाणीवर खवय्ये खूष 

नाशिक : लज्जतदार पदार्थांची झणझणीत मेजवानी ठरलेल्या सकाळ फूड फेस्टिव्हलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांची चव चाखायला खवय्यांनी गर्दी केली आहे. गुरुवारी (ता. 15) फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी खवय्यांनी सहकुटुंब फेस्टिव्हलला भेट देऊन खाद्ययात्रेचा आस्वाद घेतला. 

डोंगरे वसतीगृहावर खास त्यासाठी सकाळ फुड फेस्टिव्हलच्या माध्यमातून भारतीय आणि पाश्‍चात्य पदार्थांची खाद्ययात्रा एकाच छताखाली भरविली आहे. त्यातून नवनवीन पदार्थ चाखण्याची संधी बुधवार (ता. 14)पासून उपलब्ध झाली आहे. या खाद्यपर्वणीत वैविध्यपूर्ण शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे 70पेक्षा अधिक स्टॉल असून, जोडीला संगीताचीही मेजवानी आहे. आज म्युझीक लव्हर्स ऑक्रेस्ट्रामार्फत मराठी व हिंदी चित्रपटांतील गाजलेली गाणी सादर करण्यात आली. 
  बच्चेकंपनीसाठी डब्याला उपयुक्त असे जॅम, जेली, चटणी, जेष्ठांसाठी सरबत, महिलावर्गासाठी वाळवणांतील काही खास पदार्थ, तर स्वयंपाकघरासाठी उपयुक्त ठरतील असे आटा चक्की, क्रोकरी अशा गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचाही आनंद या महोत्सवात उपलब्ध झाला आहे. यांशिवाय महोत्सवाला भेट देणाऱ्या एका भाग्यवंताला सोनी पैठणीकडून एक सेमी पैठणीदेखिल देण्यात येणार आहे. 

शाकाहारी खवय्यासाठी... 
मांड्यावरची पुरणाची पोळी, वांग्याचे भरीत, झुणका भाकरी, ठेचा, शेगावची कचोरी, पिठलं-भाकरी, दाबेली, सांडगी, पोह्यांचे पापड, नागली, उडदाचे पापड यांसह नागलीचे पोंगे, भिस्कीट अशा नव्या जुन्या पदार्थांची रेलचेल. 
--- 
मांसाहारी खवय्यासाठी काय? 
बिर्यानी, चिकन, मटण, चायनीज, बांगडा, बोबील यांच्या मालवणीसह विविध प्रकारांत बनविलेल्या डिशेश, कोबडी वडे, सोलकढी अशा पारंपारीक मालवणी पदार्थांपासून ते कोळंबी, खेकडा आदींच्या पाश्‍चात्य पद्धतीच्या विविध डिश खवय्यांना उपलब्ध आहेत. 

Web Title: marathi news sakal food festival