मेडिकल टुरिझम क्षमता विकसित करा, सकाळ हेल्थ समीटमध्ये उमटला सूर

live
live

नाशिक : पायाभूत वैद्यकिय सुविधा, वाजवी दरात सुविधा देणारी रुग्णालय, दर्जेदार डॉक्‍टर यामुळे नाशिकमध्ये मेडीकल टुरीझमसाठी आवश्‍यक क्षमता आहेत. मात्र सोबतच, मेडिकल टुरिझमसाठी पूरक वातावरण गरजेचे आहे. ज्यासाठी वैद्यकियेत्तर घटकांची जबाबदारी आहे. त्यासाठी सर्वानी एकत्रित येउन प्रयत्न करण्याची गरज आहे. असा सूर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला. 

सकाळ माध्यम समूहातर्फे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये "हेल्थ समीट-2009' च्या सत्रात आज दुसऱ्या दिवशी मेडीकल टुरिझम या विषयावर चर्चासत्र झाले. 
 मविप्रच्या डॉ.वसंतराव पवार संशोधन व वैद्यकिय महाविद्यालयाच्या डीन डॉ. मृणाल पाटील, अशोका मेडीकव्हरच्या डॉ.अंकिता पारेख, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे डॉ.राज नगरकर, मॅग्मन हार्टचे डॉ.मनोज चोपडा, संजीवनी हॉस्पीटलचे डॉ.नितीन लाड, डॉ.नितीन बदरखे सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने आदी व्यासपिठावर होते. डॉ.वृषाली नेरकर यांनी सूत्र संचालन केले. तर श्री माने यांनी स्वागत केले. 

मान्यवरांच्या सूचना..... 
-रुग्णालयांनी एनएबीएच, जेसीआय मानांकनावर लक्ष द्यावे 
-गतीमान उपचारासाठी ग्लोबल "एसओपी' नाशिकला असावी 
-रुग्णालयांच्या पॅरा मेडिकल मनुष्यबळाची गुणवत्ता वाढावी 
-बाहेरुन येणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबियांसाठी सुविधा गरजेच्या 
-वेलनेस सेंटर म्हणून नाशिकला वातावरण विकसित व्हावे 

एका छताखाली सुविधा 
विदेशात वैद्यकिय उपचार प्रचंड महागत आहे. पैसे खर्चुन रुग्णांना डॉक्‍टरांची भेट मिळण्यासाठी दोन-दोन महिणे प्रतिक्षा असते. डॉक्‍टराचा रुग्णाशी अवघ्या काही मिनीटांचा संबध येतो मात्र सर्वाधीक संबध त्या रुग्णालयातील पॅरा मेडिकल मनुष्यबळाचा येतो. म्हणून रुग्णाच्या आरोग्यासाठी डॉक्‍टरापेक्षाही त्यांच्या पॅरा मेडिकल स्टापचा जिव्हाळा हा घटक खूप महत्वाचा ठरणार आहे.

नाशिकला अशा एकत्रित स्वरुपात दर्जेदार उपचार, गुणवत्तापूर्ण सुविधा, उच्च सुविधा उपचार जोपासणारा पॅरा मेडिकल स्टाफ, ग्लोबल मेडीक्‍लेम सुविधासारखे सुविधांतून मेडिकल टुरिझमचा विकास शक्‍य आहे. नाशिकचे वैद्यकिय क्षेत्र जागतीक पातळीवरील ही गरज भागविण्यासाठी परिपूर्ण आहे. त्याला नीट स्वरुप देण्यासाठी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. 
-डॉ.मृणाल पाटील (डीन, डॉ.वसंतराव पवार मेडीकल ऍण्ड रिसर्च सेंटर) 


जगात येणारे दशक हे वैद्यकिय सुविधांच्या अंगाने प्रचंड बदलाचे असणार आहे. मेडीकल टुरिझम हा भारतात मोठा उद्योग म्हणून नावारुपाला येणार आहे. चीन,इटली,ग्रीससह अनेक देशात युवकांची संख्या घटत असतांना वैद्यकिय सेवेसाठी कुठेही जाण्याची तयारी असलेल्या भारतातील तरुणांना यात जास्त संधी आहेत. डॉक्‍टराप्रमाणे रुग्णांची व त्यांच्यासोबतच्या कुटुंबियांची सेवा करणाऱ्या पॅरा मेडिकल आर्टीफिशियल इंन्टलिजन्स कर्मचाऱ्यांना भरपूर संधी आहे. बाहेरील रुग्णांचे प्रमाण वाढण्यामागे नाशिकचे आल्हाददायी वातावरण हेही येथील मेडीकल टुरिझम फुलविण्यासाठी पूरक आहे.
-डॉ.राज नगरकर (संचालक एचसीजी मानवता कॅन्सर) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com