#SakalForMaharashtra स्वतःतील आत्मविश्वास वृध्दींगत करण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

     रोजगाराचा शोध घेतांना, अपेक्षित संधी उपलब्ध होत नसल्याने तरूणांमध्ये असंतुष्टता वाढते आहे. दुसरीकडे उद्योगांना आवश्‍यक कुशल मनुष्यबळ मिळत नसल्याची तक्रार केली जाते. बेरोजगारीच्या प्रश्‍नाचे कारण शोधतांना, आज केवळ पुस्तकी शिक्षण देऊन भागणार नाही. कौशल्य विकास व त्याच्याजोडीला आत्मविश्वास विकसीत केल्यास असे युवक सक्षम होऊ शकतील. दुसऱ्यांवर अवलंबून राहाण्याऐवजी स्वत:च्या पायावर उभे राहाण्यासाठी प्रयत्न करतील. दुदैवाने मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थी केवळ नियमित शिक्षणाच्या आधारावर रोजगार मिळविण्याची अपेक्षा ठेवतात. व त्यांच्या पदरी निराशा येते.

काही देशांमध्ये नागरीकांना काही कालावधी सैन्यदलात सेवा देणे बंधनकारक असते. अशीच अट आपल्या देशात घातल्यास प्रत्येकाला आपल्या जीवनाचे महत्व समजेल. त्यातून उर्जेचा योग्य उपयोग करुन घेण्याचा विचार विकसीत होईल, हे नक्‍की. 

सामाजिक परीस्थितीत बदल घडविण्यासाठी तरूणांमध्ये कौशल्य विकास घडविणे आवश्‍यक आहे. सोबत समाजाजिक प्रश्‍नांकडे डोळसपणे बघण्याकरीता तशी दृष्टी विकसीत झाली पाहिजे. विषमतेचा नायनाट झाल्याशिवाय प्रगती साधता येणार नाही. तरूणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी आवश्‍यक उपक्रमांमध्ये सहभागी होणार. 
-प्रा.दिपाली चांडक, 
संचालिका, विज्डम एक्‍ट्रा. 

Web Title: marathi news sakal for Maharashtra dipali chandak

टॅग्स