#SakalForMaharashtra अनुभव हिच खरी शिदोरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

     शिक्षणाचा मूलभूत उद्देश विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा नाही. तर चांगला रोजगार मिळविण्यासाठी आवश्‍यक ज्ञान शिक्षणाlद्वारे देणे. हा आहे.. एका संशोधनात हे सिद्ध झालेले आहे, की रोजगार मिळविण्यासाठी उमेदवारातील कौशल्य पंधरा टक्‍के तर तब्बल 85 टक्‍यांपर्यंत त्याच्यातील निर्णय क्षमता, व्यापक दृष्टीकोण यासह अन्य गोष्टींना महत्व असते. असे असेल तर विद्यार्थ्यांना त्या दृष्टीकोनातून विकसीत करणे आवश्‍यक आहे. 

    मेट भुजबळ नॉलेज सिटीमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट फोरम हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आमच्याकडे विविध प्रकारचे उपक्रमांचे संयोजन विद्यार्थी करतात. त्यासाठी लागणारा निधी आता विद्यार्थी स्वत: उभारू लागले आहेत. त्यामूळे तंत्रशिक्षण घेतांना, त्यांच्यात मार्केटींग कौशल्यासह अन्य विविध बाबींचा विकसीत होत आहे.अनुभवातून बरेच काही शिकायला मिळते आहे. दुदैवाने नोकरीला मिळणाऱ्या गुणांशी जोडले जाते.

चांगले गुण मिळाले तर चांगली नोकरी मिळेल, या विचाराने विद्यार्थी संकल्पना समजून घेण्याऐवजी केवळ पाठांतरातून जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यातून त्यांच्यातील नाविण्यपूर्णता, कल्पकता मारली जाते. व पुढे नोकरी करतांनाही असे उमेदवार कॉपी-पेस्टवरच अवलंबून राहातात. आमच्या महाविद्यालयात राबविलेल्या उपक्रमाप्रमाणे इतर ठिकाणीही अशीच संकल्पना राबविण्याची आवश्‍यकता आहे. 

-प्राचार्य डॉ.व्ही. पी. वाणी, 
मेट भुजबळ नॉलेज सिटी. 

Web Title: marathi news sakal for Maharashtra dr.v.p.wani

टॅग्स