#SakalForMaharashtra सकाळची साथ अन् सोशल इनोव्हेशन हीच शक्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

     सामाजिक प्रश्‍न तीव्रतेने वाढत चालले आहे. त्यातुलनेत संशोधनांचे प्रमाण कमीच आहे. सोशल इनोव्हेशन झाल्यास त्याचा अधिकाधिक जनतेला लाभ होऊ शकेल. नाविन्यपूर्णता असल्यास, त्यास यशदेखील येईल. सध्या ज्या वेगाने लोकसंख्या वाढते आहे, त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

   सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये चार ते पाच वर्षे अभ्यासक्रमात बदल होत नाहीत. त्यामूळे प्रत्यक्ष स्थितीत झालेल्या बदलांना तरूण सामोरे जाऊ शकत नाही. आज मिनीटा-मिनीटाला तंत्रज्ञान बदलते आहे. अशा परीस्थितीत शिक्षणक्रमातही लवचिकता आणली पाहिजे. शिवाय बदलत्या तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकारच्या कामांचे अस्तित्व धोक्‍यात आहे, हेदेखील मान्य करावे लागले.

   बदलत चाललेल्या परीस्थितीत स्पर्धेला तोंड देण्यासाठी सक्षम युवक घडविणे हे व्यवस्थेपुढील आव्हान आहे. कौशल्य विकासाशिवाय युवक सक्षम होऊ शकत नाहीत. तरूण पिढीला उद्योजकतेसाठी विशेषत: स्टार्टअप्स्‌साठी प्रोत्साहित केल्यास ते स्वत: सक्षम होतील, याशिवाय इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देऊ शकतील. 

  उपक्रमशील "सकाळ' माध्यम समूहाने सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तरूणांशी संवाद साधतांना, त्यांना उद्योजकतेसाठी, स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देतांना उपक्रमात सहभाग असेल. आवश्‍यकता भासल्यास चांगल्या संशोधनांना डिजीटल इम्पॅक्‍ट स्क्‍वेअरचे सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. 

-गिरीष पगारे, 
माजी अध्यक्ष, 
कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, नाशिक शाखा. 

Web Title: marathi news sakal for Maharashtra girish pagare

टॅग्स